आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पटोलेंच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर काँग्रेस पक्षात नाराजीचे वातावरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर  - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात माजी खासदार नाना पटोले यांची उमेदवारी जवळपास पक्की मानली जात असताना काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण तयार होत आहे. पटोले यांनी पक्षाकडे अर्जही केला नसताना प्रदेश काँग्रेसने आतापर्यंत राबवलेली उमेदवार प्रक्रिया फार्स होती की कसे, असा प्रश्न आता नाराज नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.   


लोकसभा निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी यंदा प्रदेश काँग्रेसने शहर व जिल्हा कमिट्यांकडून शिफारशींसह इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याची प्रक्रिया राबवली. प्रदेश काँग्रेसने ही प्रक्रिया निश्चित करण्याला नागपूर शहर काँग्रेस कमिटीने मागील वर्षी केलेला एक ठराव कारणीभूत ठरला. कमिटीला विश्वासात घेऊनच उमेदवार ठरवले जावेत, असा हा ठराव होता. त्याची अंमलबजावणी राज्यभरात करण्यात आली. शहर काँग्रेस कमिटीने नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी अर्ज मागवले होते. त्यावर कमिटीने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि प्राचार्य बबनराव तायवाडे या नेत्यांची शिफारस प्रदेश काँग्रेस कमिटीकडे केली होती.


 माजी खासदार नाना पटोले, शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल गुडधे यांचे अर्जही नसताना स्क्रीनिंग कमिटीच्या दिल्ली येथील बैठकीत या तीन नावांची चर्चा झाल्याचे नाराज काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्यापैकी पटोलेंचे नाव निश्चित होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता ऐनवेळी कुणाला उमेदवारी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...