आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nanavati Commission Report Tabled In Gujarat Assembly Giving Clean Chit To Modi Others In 2002 Riots

नरेंद्र मोदींसह तीन मंत्र्यांना क्लीनचिट; नानावटी आयोगाचा अहवाल गुजरात विधानसभेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - माजी न्यायाधीश जीटी नानावटी यांच्या अध्यक्षतेखालील नानावटी आयोगाने 2002 च्या गुजरात दंगलीचा अहवाल गुजरात विधानसभेत बुधवारी सादर केला. गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह यांनी हा अहवाल सादर केला. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीनचिट दिली. यासोबतच, मंत्री हरेन पांड्या, भरत बारोट आणि अशोक भट्ट यांची दंगलीत काहीच भूमिका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याच अहवालामध्ये श्रीकुमार, राहुल शर्मा आणि संजीव भट्ट यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.


गृहमंत्री प्रदीप सिंह यांनी सांगितले की, ''नरेंद्र मोदींवर आरोप होता की, कोणत्याच माहितीशिवाय ते गोधराला गेले होते. या आरोपाला आयोगाने रद्द केले आहे. याबाबत सर्व सरकारी संस्थाना माहिती होती. आरोप होता की, गोधरा स्टेशनवर सर्व 59 कारसेवकांच्या मृतदेहांवर पोस्टमॉर्टम करण्यात आले होते. यावर आयोगाचे म्हणने आहे की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन नाही तर अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन पोस्टमॉर्टम झाले."


राज्याचे माजी पोलिस अधिक्षक श्रीकुमार यांनी आयोगासमोर शपथपत्र देऊन गोधरानंतर झालेल्या दंगलीमुळे सरकारच्या निष्क्रीयतेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी नोव्हेंबर, 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पटेल यांना अर्ज देऊन रिपोर्टला सार्वजनिक करण्याची मागणी केलीहोती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी 28 फेब्रुवारी 2002 ला गोधरामध्ये मारले गेलेले 59 प्रवाशांच्या मृत्यूसाठी एक समिती स्थापन केले होती. त्यानंतर राज्यात दंगली झाल्या.