आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेक दाबताच ट्रक दुभंगला, गोलपट्टीखाली चालक ठार

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली - वारंगा ते नांदेड मार्गावरील भाटेगाव शिवारात विचित्र अपघात घडला. ट्रकचे ब्रेक दाबल्याने केबिन व ट्रॉलीचा भाग वेगळा होऊन चालक केबिन बाहेर फेकला गेला. त्याच वेळी ट्रॉलीमधील लोखंडी गोल रूळ निसटून ताे घरंगळत अंगावरून गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ६ ) दुपारी हा अपघात घडला. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील आंबेसावंगी येथील ट्रकचालक शेख हमीद शेख आलाद्दीन (३३) हा गुरुवारी दुपारी  ट्रकमध्ये लोखंडी गोलपट्टीचे दोन रूळ घेऊन नांदेडकडे निघाला हाेता.  वारंगाफाटा येथे आल्यानंतर त्याने एका ढाब्यावर जेवण केले. त्यानंतर नांदेडकडे निघाला होता. त्याच वेळी जणू मृत्यूही त्याचा पाठलाग करत हाेता.
वारंगाफाटापासून काही अंतरावर भाटेगाव शिवारात उतारावर वाहनाची गती वाढल्याने त्याने अचानक ब्रेक लावल्यामुळे ट्रकचा पाठीमागील भाग पाठीमागे राहिला अन् समोरील केबिनच्या भागाला जोरदार धक्का बसला. यामुळे चालक शेख हमीद हे केबिनच्या बाहेर फेकले गेले. याचवेळी ट्रकच्या ट्रॉलीवर ठेवलेले लोखंडी रुळ तुटून रस्त्यावर घरंगळत आले. त्यापैकी एक लोखंडी रुळ शेख हमीद यांच्या अंगावरून गेल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. वाहतूक विस्कळली

या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील रुग्णालयात हलवला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक खाेळंबल्याने रस्त्यावरील ट्रकचा भाग बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. 

बातम्या आणखी आहेत...