आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह लावूनही प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर प्रथमच गावात आली होती बहीण, भावांनी भर-रस्त्यावर दोघांचेही गळे चिरले; आता झाली ही शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - जिल्ह्यातील भोकर तालुक्यात प्रेमीयुगुलाची हत्या केल्या प्रकरणी दोन भावांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जुलै 2017 मध्ये पीडित मुलीच्या सख्ख्या भावांनी तिचा आणि तिच्या प्रियकाराचा भररस्त्यात गळा चिरून हत्या केली होती. प्रियकरावर हल्ला झाल्यानंतर ती बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच दुसऱ्या भावाने तिचा गळा चिरला होता. प्रियकाराचा तर जागीच मृत्यू झाला. आरोपींनी त्याला रस्त्याच्या बाजूला फेकले होते. परंतु, अजुनही जीव असलेली तरुणी रक्तरंजित अवस्थेत मदतीसाठी तडपत होती. रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना ती मदतीच्या याचना करत होती. मात्र, कुणीही तिच्या मदतीला धावून आले नाही. उलट दगडाच्या काळजांचे लोक आपल्या मोबाइलमध्ये या घटनेचा व्हिडिओ करण्यातच मग्न होते.


प्रेमसंबंधाला होता भावांचा विरोध...
> थेरबनची रहिवासी पूजा हिचे दीड महिन्यापूर्वी लग्न झाले होते. कुटुंबियांनी तिच्या मनाविरुद्ध जेठीबा वर्षावार या तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले होते. तिचे गावातील फोटोग्राफर तरुण गोविंदवरच प्रेम होते. लग्नानंतरही त्यांच्या भेटी सुरूच होत्या. जून 2017 मध्ये पूजा आणि गोविंद घरातून पळून गेले. दोघे काही दिवस तेलंगणात राहिल्यानंतर जुलै 2017 मध्ये नांदेडला परतले होते. याचीच चुनुक तिचे भाऊ दिगंबर दासरे आणि मोहन दासरे यांना लागली होती. दिगंबरने बहिण पूजा आणि तिचा प्रियकर गोविंद यांचा शोध घेतला आणि त्यांच्याकडे गेला.
> त्याने सुरुवातीला पूजा हिला बळजबरीने घरी नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, विरोध केला असता दिगंबरने धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले. बहिणीवर वार केल्यानंतर दिगंबरने तिचा प्रियकर गोविंदला भररस्त्यात भोसकले. त्याच्यावर एवढे गंभीर वार केले की तो जागीच गतप्राण झाला. पूजाने प्रियकराला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी तिच्या गळ्यावरून चाकू फिरवला.


तरुणी रक्ताच्या थारोळ्यात अन् गावकरी बनवत राहिले व्हिडिओ...
भर रस्त्यावर दिगंबरने पूजा आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. परंतु गावातील एकही जण त्यांना मदतीसाठी पुढे आला नाही. पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना गावकरी मात्र मोबाइलमध्ये तिचा व्हिडिओ बनवत होते. पूजाच्या तोंडातून शब्द फुटत नसल्याने ती हात रस्त्यावर आपटून मदतीची भीक मागत होती. मात्र एकही जण तिच्या मदतीसाठी पुढे आला नाही. बहीण आणि तिच्या प्रियकराचा खून केल्यानंतर आरोपी दिगंबर स्वत: पोलिसांना शरण गेला होता. यानंतर दुसऱ्या आरोपीला देखील अटक करण्यात आली. भोकरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी दिगंबर बाबूराव दासरे याला फाशीची तर मोहन नागोराव दासरे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


हेही वाचा...
ऑनर किलिंग : बहीण व तिच्या प्रियकराचा गळा चिरणाऱ्या एका भावाला फाशी, तर दुसऱ्याला जन्मठेप