आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडला कोरोनाचा एक संशयित रुग्ण; तरुण काही दिवसांपूर्वी कामासाठी बहरीनला गेला होता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन संशयित रुग्णांना रुग्णालयातून सुटी

नांदेड- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका २५ वर्षीय तरुणाला कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले. त्याच्या स्वॅबचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी  दिली. 


लोहा तालुक्यातील कळेगाव येथील तरुण कामासाठी काही महिन्यांपूर्वी बहरीनला गेला होता. परंतु तेथे कोरोनाचे ५० रुग्ण आढळले. त्यामुळे हा तरुण रविवारी हैदराबाद येथे आला. सोमवारी तो शहरात दाखल झाला. सर्दी आणि ताप अाल्याने तो शासकीय रुग्णालयात दाखल झाला. तपासणीत त्याला कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्याला कोरोना रुग्णांसाठी निर्मित विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्याचे थुंकी अन् इतर नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत येथे पाठवण्यात आले होते. त्यापैकी एक अहवाल निगेटिव्ह आला.  वैद्यकीय अधीक्षक डाॅ. वाय.एस.चव्हाण यांनी सांगितले की, त्या रुग्णाचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला.  त्याच्या घशातील आतील (डीप) स्वॅबचे नमुने परत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यत आपण त्याला कोरोनामुक्त घोषित करू शकत नाही. 

दोन संशयित रुग्णांना रुग्णालयातून सुटी

काही दिवसांपूर्वीच नांदेड येथे चीनमधून आलेला एक संशयित रुग्ण आढळला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या भावालाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.