आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून पुढील तीन रविवारची नांदेड-दौंड पॅसेंजर रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -  नांदेड ते मनमाड या मार्गावरील प्रवाशांचा भार हलका करण्यासाठी दररोज  रात्रीच्या वेळी चालणारी पॅसेंजर नांदेड-दौंड-नांदेड ही गाडी आजपासून (२८ ऑक्टोबर) चार रविवारसाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे रात्रीच्या वेळी ह्या गाडीचा आधार घेणाऱ्या प्रवाशांना इतर गाड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे.  

 
सिकंदराबाद विभाग मध्य रेल्वेच्या काही मार्गावर दर रविवारी काम केले जाणार असून ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाडी ते सोलापूर, सोलापूर ते दौंड, दौंड ते मनमाड  या मार्गाचा समावेश आहे. यामुळे या मार्गावरून चालणाऱ्या  काही गाड्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यात नांदेड-जालना मार्गावरील नांदेड -दौंड ह्या पॅसेंजर गाडीचा समावेश आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात.

 

सायंकाळी मनमाड मार्गावरून औरंगाबाद, जालन्याकडे येणाऱ्यांना दादर - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, त्यानंतर जालना-नगरसोल डेमू गाडी यासह काकीनाडा ह्या गाडीचा आधार आहे. ह्या गाड्या नंतरही ह्या मार्गावर आधार देणारी नांदेड-दौंड-पॅसेंजर गाडी आहे. पुढील चार रविवार ही गाडी बंद असल्याने चाकरमान्यांना याचा फटका बसणार नाही. मात्र, नियमित कामगारांना याचा काही प्रमाणात फटका बसू शकेल. यामुळे प्रवाशांना ह्या चार रविवारसाठी वेळेत बदल करावा लागणार आहे. काहींना रात्रीच्या सुपरफास्ट गाड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे.   
नांदेड ते मनमाड मार्गावरील समस्या कायमच : नांदेड विभागातून मराठवाड्यावर नेहमीच दुर्लक्ष होत असून कोणत्या न कोणत्या कारणांवरून नांदेडपासून ते मनमाड ह्या मार्गावर प्रवाशांची असुविधा होते. कधी जुनाट रेल्वे इंजिन बिघाड तर ऐनवेळी लागणाऱ्या गाड्यांना या मार्गावरील इंजिन देणे यामुळे मराठवाड्यातील रेल्वे मार्गावरील प्रवाशांना काही प्रमाणात अडचणी येतात.

 

या मार्गावरील प्रवाशांना सुविधा वाढवून गाड्यांची संख्याही वाढवण्यात यावी, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीची अाहे. इतर ठिकाणी होत असलेल्या ब्लॉकमुळे नांदेड ते मनमाड अशी सेवा बंद सुरू ठेवणे अपेक्षित असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.    

 

अशा आहेत रद्द फेऱ्या    
नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या ५७५१६ नांदेड - दौंड पॅसेंजर ही २७ ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यातील ३, १० आणि १७ रोजी रद्द करण्यात आली आहे. तर  परतीच्या मार्गावरून दौंड येथून सुटणारी गाडी संख्या ५७५१५ दौंड- नांदेड पॅसेंजर २८ ऑक्टोबर तसेच ४,११ आणि १८ नोव्हेंबर अशी रद्द करण्यात आली आहे.  

बातम्या आणखी आहेत...