आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड-दिल्ली स्वतंत्र विमानसेवा सुरू, दोन दिवस सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड -  नांदेड शहर आता  हवाई मार्गाने थेट देशाची राजधानी दिल्लीशी जोडले गेले आहे. एकीकडे महाराष्ट्रातील अनेक बड्या जिल्ह्यांतील विमानसेवा बंद असताना नांदेडमधून सोमवारी चौथी विमानसेवा सुरू झाली आहे. उडान योजनेअंतर्गत नांदेड, हैदराबाद आणि नांदेड मुंबई ही विमानसेवा सुरू झाली होती. जी अजूनही व्यवस्थित सुरू आहे. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी नांदेड अमृतसर ही विमानसेवा सुरू झाली. सोमवारपासून नांदेड दिल्ली ही स्वतंत्र विमानसेवा सुरू झाली आहे.


विशेष म्हणजे नांदेड इथून अमृतसर आणि दिल्ली या दोन्ही शहरांसाठी जाणाऱ्या विमानांचे पुढील ३ महिने शंभर टक्के बुकिंग  झाले आहे. सोमवारी नांदेड दिल्ली या विमानसेवेची सुरुवात झाली आहे. १२० आसनी विमान जाताना आणि येताना दोन्ही वेळेस फुल्ल होते. आठवड्यातून २ वेळेला नांदेड दिल्ली विमानसेवा सुरू असणार आहे. नांदेड ते दिल्ली, नांदेड ते अमृतसर या दोन सेवा एअर इंडियामार्फत आहेत तर नांदेड ते हैदराबाद, नांदेड ते मुंबई या ट्रू जेट कंपनीमार्फत सेवा सुरू आहेत. राज्यातील अन्य विमानतळे अशीच सुरू करावीत अशी मागणी या वेळी खासदार अशोक चव्हाण यांनी केली.   

 

मुंबई, हैदराबादसाठी दररोज विमानसेवा
नांदेड विमानतळावरून आता नांदेड ते मुंबई आणि नांदेड ते हैदराबादसाठी दररोज विमानसेवा उपलब्ध झाली आहे. नांदेड-अमृतसर ही विमानसेवा आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवार, रविवार असणार आहे. नांदेड- दिल्ली ही विमानसेवा आठवड्यातून दोन दिवस म्हणजे सोमवार व गुरुवार असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...