आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडचे मनसे जिल्हाप्रमुख संभाजी जाधव यांची आत्महत्या, विद्यार्थी काळापासून होते राज ठाकरेंच्या संपर्कात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले नांडेड मनसे जिल्हाप्रमुख संभाजी जाधव (46) यांनी आत्महत्या केली आहे. विद्यार्थी काळापासून ते राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापित केला तेव्हा संभाजी जाधव यांनीही शिवसेना सोडली होती. त्यावेळी ते विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत होते. शेतकरी असलेले संभाजी जाधव यांच्या शेतीवरील कर्ज वाढले होते. याच नैराश्यातून त्यांनी आपले आयुष्य संपवले असे सांगितले जात आहे.

नांदेडच्या डौर गावचे संभाजी जाधव रहिवासी होते. या गावातच त्यांची वडिलोपार्जित जमीन आणि शेती होती. ते शहरातील तरोडा नाका परिसरात राहत होते. तरोडा नाका परिसरातील राहत्या घरातच त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेतला. त्यांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेतीवर विसंबून होता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून सततच्या दुष्काळाने शेतीवरील कर्ज दिवसेंदिवस वाढत गेले. याच नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. उल्लेखनीय बाब म्हणजे, नुकतेच ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. त्या दुखात मुंबईतील मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केली होती.

बातम्या आणखी आहेत...