आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड-यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, विद्यापीठाच्या यंत्रावर नोंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठावरील हिमायतनगर, उमरखेड, हदगाव, किनवट, ढाणकी, माहूर, महागाव, मांडवी, कोल्हारी, इस्लापूर आदींसह  शहर व ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.  काही ठिकाणी तर जमिनीतून गडगडल्यासारखा आवाज आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंप मापक यंत्रावर हा धक्का ३.९ रिश्टर स्केल असा नोंदवला गेला.


हिमायतनगर येथे रात्री ९.१६ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. शिवाय हदगाव, किनवट, माहूरसह यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे ९.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला.  भूकंपाचा धक्का जाणवताच अनेक जण घरातून बाहेर पडत रस्त्यावर आले. अनेकांनी आपल्या नातेवाइकांशी संपर्क करून हाल - हवाल विचारले.  किनवट तालुक्यात भूकंपाच्या धक्क्याने घराचे छत पडल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर फिरत आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी प्रशासनाकडे विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळाला नसला तरी भूकंपाचा धक्का जवळपास शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना जाणवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  दरम्यान, २० जून रोजी महाराष्ट्रातील काही शहरांना भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही असे धक्के बसल्याने लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.