आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नंदुरबार - स्फोटसदृश आवाजाने शुक्रवारी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी नंदुरबार शहरासह जिल्हा हादरला. हा आवाज एवढा मोठा होता की आजूबाजूच्या २२ किमीपर्यंत आवाज झाला व त्याचे हादरले बसले. भूकंप झाला की बॉम्बस्फोट या भीतीने घरातून नागरिक बाहेर पळाले. आकाशातील पक्ष्यांमध्येही चलबिचल झाली. जमीन काही सेकंद हलली. दरम्यान, हा आवाज सुपरसॉनिक बूम फायटर जेट सुखाेई विमानाचा होता, असा खुलासा प्रशासनाने केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शुक्रवारी दुपारी स्फोटसदृश आवाजाने एकच गोंधळ उडाला. नंदुरबारकर घर सोडून बाहेर पडले. विमान कोसळल्याची व गॅस सिलिंडरच्या ट्रकचा स्फोट झाला, अशा विविध अफवांचे पेव फुटले. अखेर हा स्फोट नसून सुपरसॉनिक बूम फायटर जेट सुखोई विमान नाशिककडून पुण्यात गेले. त्याचा हा आवाज होता, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी दिली. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वा:स सोडला.
नंदुरबार
स्फोटसदृश आवाजाने शुक्रवारी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी नंदुरबार शहरासह जिल्हा हादरला. हा आवाज एवढा मोठा होता की आजूबाजूच्या २२ किमीपर्यंत आवाज झाला व त्याचे हादरले बसले. भूकंप झाला की बॉम्बस्फोट या भीतीने घरातून नागरिक बाहेर पळाले. आकाशातील पक्ष्यांमध्येही चलबिचल झाली. जमीन काही सेकंद हलली. दरम्यान, हा आवाज सुपरसॉनिक बूम फायटर जेट सुखाेई विमानाचा होता, असा खुलासा प्रशासनाने केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शुक्रवारी दुपारी स्फोटसदृश आवाजाने एकच गोंधळ उडाला. नंदुरबारकर घर सोडून बाहेर पडले. विमान कोसळल्याची व गॅस सिलिंडरच्या ट्रकचा स्फोट झाला, अशा विविध अफवांचे पेव फुटले. अखेर हा स्फोट नसून सुपरसॉनिक बूम फायटर जेट सुखोई विमान नाशिककडून पुण्यात गेले. त्याचा हा आवाज होता, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर नवले यांनी दिली. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वा:स सोडला.
विमान नाशिकहून पुण्याकडे गेले
नंदुरबारचा परिसर हा नाशिक एचएएलअंतर्गंत येतो. नाशिकहून हे विमान केवळ सरावाचा एक भाग म्हणून पुण्याकडे गेले. ते सुखरूप पोहचले,असा खुलासाही यावेळी करण्यात आला. यासंदर्भात अपर जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी म्हणाले, वायू वेगाने हे िवमान जाते. त्यामुळे हवेची पोकळी निर्माण होते.यामुळेच स्फोटासारखा आवाज येतो. हा आवाज नंदुरबारकरांसाठी नवीन असला तरी नाशिककरांसाठी नवीन नाही,असेही ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.