आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात शिवसेना भाजपनेच सत्ता स्थापन करावी यासाठी शिवसैनिकाचे टॉवर चढून आंदोलन   

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार - राज्यात सेना भाजपानेच सत्ता स्थापन करावी या मागणीसाठी नंदुरबारमध्ये टॉवरवर चढत एका शिवसैनिकानी अनोखे आंदोलन सुरु केले आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतची अभद्र युती करु नये अशी मागणी या शिवसैनिकाने केली आहे. याबाबत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत जो पर्यंत फोन वरुन संवाद होणार नाही तो पर्यंत टॉवरवरुन उतरणार नसल्याची भूमिका या शिवसैनिकाने जाहीर केली आहे. तुकाराम पाटील असे या शिवसैनिकाचे नाव असुन तो तालुक्यातील कार्ली गावचा रहिवाशी आहे. तो सकाळी 11 वाजेपासुन मोबाईल टॉवरवर चढला असुन अद्यापही खाली उतरला नाही. युवकाने टॉवरच्या प्रवेशद्वारावर सविस्तर चिठ्ठी लिहुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असुन त्याच्याशी संवाद साधत त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तो आपल्या मागणीवर ठाम आहे.