आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदुरबार रेल्वे स्थानकावर महिलेची छेड काढल्याप्रकरणी दोन गटांत वाद; 4 पोलिसांसह 11 जण जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार  नंदुरबार रेल्वे स्थानकावर महिलेची छेड काढल्याचा वादातून रविवारी रात्री दगडफेकीची घटना घडली. पोलिसांनी थांबवण्याचा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही दगडांचा वर्षाव करण्यात आला. या घटनेत एक पोलिस अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 10 संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

दगडफेकीमुळे रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ माजला होता. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी 6 अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत एक पोलीस अधिकारी आणि पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. आज सकाळ पासून पोलिसांनी नंदुरबार शहराच्या विविध भागात कोंबिंग ऑपरेशन करीत 10 संशयित लोकांना ताब्यात घेतले आहे. शहरात शांतता असून पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागात गस्त वाढवली आहे, 

या दगडफेक प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर महिलेला छेड काढल्या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...