आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री अचानक उठून रडू लागायची मुलगी, महिलेला समजत नव्हते कारण.. फुटेज पाहिल्यानंतर बसला शॉक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेटोन्ग - चीनमध्ये एखा महिने तिच्या बाळावर झालेल्या टॉर्चरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. महिला तिच्या 7 महिन्यांच्या मुलीला मोलकरणीकडे सोडून जात होती. त्यादरम्यान तिची मुलगी रात्री अचानक झोपेतून उठून रडू लागायची. पण महिलेला नेमके कारण समजत नव्हते. पण जेव्हा तिने घराचे सीसीटिव्ही फुटेज पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. फुटेजमध्ये मोलकरणी चिमुरडीला बेदम मारताना महिलेला दिसले. ही महिला बाळाला जमिनीवर आपटायची आणि टॉवेलने तिचे तोंडही दाबताना फुटेडमध्ये दिसले. महिलेने पोलिसांत तक्रार केली पण पोलिसांनी प्रकरण फार गंभीर नसल्याचे म्हणत मोलकरणीला अटक करण्यास नकार दिला. 


मुलीला करायची मारहाण 
- हे प्रकरण डेटोन्ग सिटीतील आहे. कपल त्यांच्या मुलीला मोलकरणीकडे सोडून गेले होते. मुलीची आई लियुने सांगितले की त्यांनी फक्त 6 दिवसांसाठीच मोलकरीण ठेवली होती. 
- पण मुलगी रात्रीची झोपेतून उठून जोरात रडू लागायची. त्याचे कारण कोणालाही कळत नव्हते. 
- एक दिवस लियुने याचे कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. तेव्हा तिला मुलीबरोबर होणारे टॉर्चर समजले. 
- मुलगी रडत असली की तिला शांत करण्याऐवजी मोलकरीण तिला प्रचंड मारहाण करायची आणि जोरात जमिनीवर आपटायची देखिल. इतर वेळी ती फोनवर बिझी असायची. 
- जास्त रडल्यास टॉवेलमध्ये तोंड गुंडाळून ती बाळाला ओढायची. 
- लियुने सांगितले की, मोलकरणीला या कामाच्या मोबदल्यात 36000 रुपये दिले जात होते. तरीही ती बाळाला टॉर्चर करायची. 


मोलकरणीला केले नाही अरेस्ट 
लियुने याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आणि पोलिसांतही तक्रार केली. पण पोलिसांनी फुटेज पाहिल्यानंतर हे प्रकरण गंभीर नसल्याचे सांगत मोलकरणीला अटक केली नाही. मोलकरीण उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सीने मात्र फॅमिलीला नुकसान भरपाई दिली. 

 

बातम्या आणखी आहेत...