आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृसिंह जयंती आज : भक्त प्रल्हादाने बांधले होते भगवान नृसिहांचे हे मंदिर, हजारो वर्ष जुनी आहे मूर्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज शुक्रवार (17मे) नृसिंह जयंती आहे. भगवान विष्णूच्या 24 अवतारांपैकी एक भगवान नृसिंह अर्धे सिंह आणि अर्धे मनुष्याच्या रूपात अवतरीत झाले होते. त्यांनी आपला भक्त प्रल्हादला वडील हिरण्यकश्यपूच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी हा अवतार घेतला होता. आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणमपासून फक्त 16 किमी अंतरावर असलेल्या सिंहाचल पर्वतावर भगवान नृसिंहाचे मंदिर खूप विशेष आहे. मान्यतेनुसार, सर्वात आधी हे मंदिर नृसिंह देवाचा परमभक्त प्रल्हाद याने बांधले होते. तसेच मंदिरातील मुर्ती हजारो वर्षांपुर्वीची आहे. परंतु हे मंदिर अनेक वर्षांनी जमीनदोस्त झाले.  


या मंदिरात भगवान नृसिंह लक्ष्मीसोबत विराजमान आहेत. पण त्यांच्या मुर्तीवर सर्वकाळ चंदनाचा लेप लावलेला असतो, हा लेप फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशी एक दिवसासाठी काढला जातो. त्यामुळे याच दिवशी भक्तांना खऱ्या मुर्तीचे दर्शन करता येते. 


सिंहाचलम देवस्थानच्या अधिकृत वेबसाइटनुसार, प्रल्हादानंतर 'पुरूरवा' नावाच्या राजाने या मंदिराची पु्न्हा स्थापना केली. विशेष म्हणजे पुरूरवा राजाने जमीनीत असलेल्या मंदिरातील भगवान नृसिंहाची मुर्ती काढून तेथे स्थापन केली आणि त्या मुर्तीला चंदनाचा लेप लावून झाकून टाकले. तेव्हापासूनच येथे अशा प्रकारच्या पुजेची परंपरा सुरू झाली. वर्षातून फक्त वैशाख महिन्यातील तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीयेला हा लेप काढला जातो. याच दिवशी येथे सर्वात मोठा सण साजरा केला जातो. भगवान नृसिंहाच्या विशेष मान्यता असलेल्या या मंदिराचा 13 शतकातील अनेक राजांनी जीर्णोद्धार केला होता. 


का चंदनाच्या लेपात झाकली जाते मुर्ती
पौराणिक मान्यतेनुसार, हिरण्यकश्यपुचा वध करतेवेळी भगवान नृसिंह खूप क्रोधीत होते. हिरण्यकश्यपुला मारल्यानंतरही त्यांचा राग शांत होत नव्हता. त्यांचा राग शांत करण्यासाठी महादेवांनीही खूप प्रयत्न केले पण नृसिंह देवाचा राग शांत झाला नाही. या क्रोधामुळे त्यांचे संपुर्ण शरीर जळत होते, म्हणून त्यांना गारवा मिळण्यासाठी चंदनाचा लेप लावण्यात आला. तेव्हापासूनच भगवान नृसिंहाची मुर्ती चंदनाच्या लेपात ठेवली जात आहे. त्यामुळे परंपरेनुसार फक्त अक्षय्य तृतीये दिवशी हा लेप मुर्तीवरून काढला जातो.


या मार्गाने पोहचू शकता मंदिरात
हे मंदिर विशाखापट्टणम शहरापासून फक्त 16 कि.मी. अंतरावर आहे. विशाखापट्टनला आपण रेल्वे, बस किंवा प्लेन अशा तिन्ही मार्गाने जाऊ शकता. तेथून आपण मंदिरापर्यंत बस किंवा खासगी वाहनाने जाऊ शकता 


दर्शनाची वेळ
सकाळी चार वाजल्यापासून मंगल आरतीसोबत दर्शन सुरू होते. सकाळी 11.30 ते 12 आणि दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत दोन वेळेस आर्ध्या घंट्यासाठी दर्शन बंद केले जाते. भक्तांनी यावेळेतच दर्शनासाठी यावे कारण रात्री 9 वाजता देवाची झोपण्याची वेळ होते. 

बातम्या आणखी आहेत...