Home | Maharashtra | Pune | Naravir Tanaji Malusareen's original Samadhi is found

नरवीर तानाजी मालुसरेंची मूळ समाधी प्रकाशात; सिंहगडावरील बांधकामादरम्यान वास्तू सापडली 

प्रतिनिधी | Update - Feb 14, 2019, 09:06 AM IST

नरवीर तानाजींचे हे स्मृतिस्थळ वंदनीय आहे. ते अनेकांना प्रेरणा देत राहील.

  • Naravir Tanaji Malusareen's original Samadhi is found

    पुणे- 'आधी लगीन कोंढाण्याचं' असे म्हणत ज्या गडावर नरवीर तानाजी मालुसरे यांनी वीरमरण पत्करले त्या तानाजी मालुसरे यांची मूळ समाधी सिंहगडावर नुकतीच प्रकाशात आली आहे. पुरातत्त्व विभागाच्या परवानगीने गडावर सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामादरम्यान समाधीचे हे मूळ बांधकाम उजेडात आले आहे. मालुसरे यांची ही 'देहसमाधी' (युद्धात जिथे त्यांना वीरमरण आले ती जागा) असल्याचे निरीक्षण ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले. या नव्या उपलब्धीमुळे सिंहगडावर आता तानाजी मालुसरे यांचा पुतळा आणि देहसमाधी अशा दोन पवित्र वास्तूंचे दर्शन घडणार आहे.

    सिंहगडावर काही दिवसांपासून मालुसरे यांचा पुतळा नव्या मेघडंबरीखाली उभारण्याचे काम सुरू आहे. जुनी मेघडंबरी लहान आहे तसेच ढासळण्याची भीती असल्याने हे काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी पुतळा तात्पुरता हलवून त्या जागेवरील चौथऱ्याचे बांधकाम पाडण्यात येत होते. तिथेच जुना वीरगळ (शूर योद्ध्यांच्या स्मृतीसाठीचे शिल्प) सापडला होता. वीरगळ योद्ध्याच्या पेहरावात असून हातात ढाल-तलवार आहे. त्याच ठिकाणी चौथरा हटवत असताना जुने बांधकाम सापडले आणि ती जागा नरवीर तानाजी यांच्या देहसमाधीचे स्थान असल्याचे नक्की झाल्याचे सांगण्यात आले.

    स्मतिस्थळ वंदनीय
    नरवीर तानाजींचे हे स्मृतिस्थळ वंदनीय आहे. ते अनेकांना प्रेरणा देत राहील. नरवीर धारातीर्थी पडले त्यानंतर स्वत: शिवाजी महाराजांनी हे समाधिस्थळ बांधल्याचे इतिहास सांगतो. शीतल मालुसरे, मालुसरे यांच्या वंशज

Trending