आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला, 'या' तारखेला दोन्ही मुलांसोबत पक्षप्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर नारायण राणेंच्या भाजप प्रवेश मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर आली. नारायण राणे येत्या 2 ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.


मागील अनेक दिवसांपासून राणेंच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा राज्यात सुरू होती. पण, काही कारणास्तव अनेकदा हा प्रवेश पुढे ढकलला गेला. आता अखेर 2 ऑक्टोबरला गरवारे हॉलमध्ये संध्याकाळी 4 वाजता राणे भाजपवासी होणार आहेत. राणे यांच्यासोबत त्यांची मुले नितेश राणे आणि निलेश राणेदेखील भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...