फाेटाे ऑफ द / काँग्रेसमधून आलेले राणे संघाच्या वर्गात; आधी विराेध, आता ‘संघ दक्ष’

शिवसेनेच्या नेतृत्वावर खालच्या भाषेत टीका करणारे नितेश आता ‘पुढील १३ दिवस शिवसेनेवर टीका करणार नाही,’ असे सांगत आहेत

दिव्य मराठी

Oct 08,2019 05:20:00 AM IST

कणकवली - विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शस्त्रपूजन व संचलनाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. सोमवारी कणकवलीतही असा कार्यक्रम झाला. नुकतेच भाजपत आलेले नितेश राणे या वेळी उपस्थित हाेते. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये असताना नितेश यांनी जाे संघ परिवार व भाजपवर तोंडसुख घेतले, त्यांचाच जयजयकार करण्याची वेळ आता राणेंवर आली आहे.

नितेश राणे- सेनेत थेट लढत

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र असलेले नितेश हे कणकवलीतून भाजपचे उमेदवार आहेत. राज्यात युती असली तरी शिवसेनेचे व राणेंचे ‘विळ्या-भाेपळ्या’चे सख्य असल्यामुळे सेनेने राणेंविराेधात इथे उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे राणेंचा गट साेडून आलेल्या सतीश सावंत यांनाच मैदानात उतरवले आहे. भाजपचे बंडखाेर संदेश पारकर यांनीही अर्ज मागे घेत राणेंविराेधात शिवसेनेला पाठिंबा दिलाय.

म्हणे, सेनेवर टीका करणार नाही

स्थानिक भाजप व शिवसेनेचे नेते विरोधात असले तरी नितेश यांनी निवडणुकीच्या तोंडावर संयमी भूमिका घेतली आहे. आजवर शिवसेनेच्या नेतृत्वावर खालच्या भाषेत टीका करण्यात धन्यता मानणारे नितेश आता ‘पुढील १३ दिवस शिवसेनेवर टीका करणार नाही,’ असे सांगू लागलेत. मी कणकवलीतल्या शिवसैनिकांच्या संपर्कात राहणार आहे, मला त्यांचीही मदत हवी आहे,’ असेही राणेे सांगतात.

X
COMMENT