आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंचा पक्षप्रवेश माझ्या ताकदीबाहेर : चंद्रकांत पाटील 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शहा हे चर्चा करतील अाणि मगच राणेंच्या भाजप प्रवेशाचा अंतिम निर्णय हाेईल, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिले. राणे यांचा पक्षप्रवेशाचा विषय माझ्या ताकदीबाहेरचा असल्याचे सांगत त्यांनी जास्त बाेलणे टाळले. उदयनराजे हे राजघराण्यातील आहेत. त्यांनी माेदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाची इच्छा व्यक्त केली तर तीही पूर्ण केली जाईल, असेही ते म्हणाले. काेणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्यांना पक्षात घेणार नाही.तसेच पक्षात येणाऱ्यांनी पदाची अपेक्षा ठेवू नये, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. 


राज्यात युती हाेणारच 
पाटील म्हणाले, 'भाजप आणि शिवसेना यांच्यात युती हाेणारच. याबाबतची बाेलणी महाजनादेश यात्रा संपल्यानंतर सुरु हाेतील. जागा वाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री, अमित शाह व उध्दव ठाकरेच घेतील. सर्व्हेक्षणानुसार लाेकसभा निवडणुकीत विधानसभेच्या २२७ जागांवर युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यानंतर आणखी पक्षप्रवेश झाल्याने आमच्या आणखी जागा वाढतील.' 

बातम्या आणखी आहेत...