आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर नारायण राणेंचा 'स्वाभिमान' भारतीय जनता पक्षात विलीन, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राणे कुटुंब भाजपात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधुदुर्ग- मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे कणकवली येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अखेर भाजपात दाखल झाले. तसेच, त्यांनी आपला स्वाभिमान पक्षही भाजपात विलीन केला आहे. यावेळी नारायण राणेंचे सुपूत्र माजी खासदार निलेश राणे हेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राणे कुटुंबातील कोणीही शिवसेनेचा एकदा ही उल्लेख केला नाही. नितेश राणे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. 
स्वाभिमान भाजपात दा
खल
या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आजच्या दिवसांकडे अनेकांच्या नजरा लागून होत्या. राणेंचा प्रवेश कधी असे विचारले जात होते? पण, ते भाजपचे अधिकृत खासदार आहेत. आधी नितेश यांचा भाजप प्रवेश झाला आणि आज निलेश आणि संपूर्ण महाराष्ट स्वाभिमानचा भाजपात प्रवेश झाला हे जाहीर करतो. आतापर्यंत नारायण राणेंसोबत भरपूर काम केले. आक्रमक नेता म्हणून काम पाहिले. त्यांनी अनेक युवा आमदारांना प्रोत्साहीत केले. त्यांचे भरपूर प्रेम मिळाले. मध्यळ्या काळात दुरावा आला असेल, पण वैयक्तिक संबंध चांगले राहिले. राणेंच्या नेतृत्वाचा फायदा पक्षविस्ताराला होईल, सरकार चालवायला होईल", असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी नेहमी आक्रमक पवित्रा घेणाऱ्या नितेश राणेंना आता संयमाने वागण्याचा सल्ला दिला.

 

बातम्या आणखी आहेत...