'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सगळ्यात मोठे ब्लॅकमेलर', प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर गंभीर आरोप


काँग्रेसने आघडी करू नये म्हणून भाजपने खोडा घातला.

दिव्य मराठी

Apr 05,2019 12:20:00 PM IST

अकोला- वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर काही काळापासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या वक्तव्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सगळ्यात मोठे ब्लॅकमेलर' असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. गांधी परिवाराचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ड वधेरांसाठी भाजपने त्यांना ब्लॅखमेल केल्याचा आरोप मोदींवर केला. शिवाय काँग्रेसने कोणासोबतच आघाडी करू नये यासाठीदेखील भाजपने प्रयत्न केल्याच ते यावेळी म्हणाले.

काँग्रेससोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काँग्रेससोबत आघाडी करायची होती, पण दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यामुळे आघाडी होऊ शकली नाही असा आरोप त्यांनी केला.

X