आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरेंद्र माेदी, राहुल गांधी एकाच दिवशी उडवणार प्रचाराचा बार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र माेदी व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी एकाच दिवशी महाराष्ट्राच्या प्रचार दाैऱ्यावर येत आहेत. माेदींच्या १३ ते १८ ऑक्टाेबरदरम्यान, तर राहुल यांच्या १३ ते १५ ऑक्टाेबरदरम्यान सभा हाेणार आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले, १३ ऑक्टोबर रोजी माेदींची पहिली सभा जळगाव येथे हाेईल. याच दिवशी साकोली (जि. भंडारा) येथेही त्यांची सभा होणार आहे. १६ ऑक्टोबरला अकोला, पनवेल व परतूर येथे, १७ ऑक्टोबरला पुणे, सातारा आणि परळीत माेदींच्या सभा हाेतील. १८ ऑक्टोबरला मुंबईतील सभेने माेदींच्या दौऱ्याची सांगता होईल. राहुल गांधी यांच्या सभांबाबत इराणी म्हणाल्या, 'ज्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाला तेव्हा राहुल कुठे होते? यूकेमध्ये आपल्या देशाविरोधात घोषणा देणाऱ्यांसोबत काँग्रेसचे नेते कसे उभे होते?' याची उत्तरे त्यांनी सभांतून द्यावीत.

मराठवाडा, विदर्भात राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची १३ ऑक्टोबरला धारावी येथे व लातूर जिल्ह्यातील औसा येथे जाहीर सभा होणार आहेत. विदर्भात एक सभा घेण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...