आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी निवडणुकीच्या 2 महिने आधी 17 राज्यांत 200 प्रकल्प केले सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली  - निवडणुकीच्या एक महिना आधी मोदींनी देशभरात २८ दौरे केले. ते १७ राज्यांत गेले होते. सर्वात जास्त सात वेळा उत्तर प्रदेशात, प्रत्येकी तीन वेळा तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गेले. यूपीत गेल्या निवडणुकीत रालोआला ८० पैकी ७३ जागा मिळाल्या होत्या. मोदींनी या काळात सुमारे १५७ प्रकल्पांचे भूमिपूजन किंवा उद्घाटन केले. या प्रकल्पांत महामार्ग, रेल्वेमार्ग, मेडिकल कॉलेज, रुग्णालय, शाळा, गॅस पाइपलाइन, विमानतळ, पाणीपुरवठा, वीज केंद्रे यांचा समावेश आहे. 


मोदींनी गाझियाबादमध्ये हिंडन  सिव्हिल टर्मिनलचेही उद्घाटन केले. गेल्या २० दिवसांतच २ लाख कोटी रुपयांच्या ५० पेक्षा जास्त प्रकल्पांना हिरवी झेंडी दाखवली. त्यात पंतप्रधान शेतकरी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ७५ हजार कोटी रुपयांचाही समावेश आहे. अमेठीचा रायफल कारखाना, बिहारला ३३ हजार कोटी रुपयांची मदत आणि इंडिया गेटवर देशाच्या पहिल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. मोदींनी ८ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान ५७ प्रकल्प सुरू केले होते. त्यानंतरच्या चार आठवड्यांत त्यांनी तिप्पट प्रकल्प सुरू केले. म्हणजे गेल्या दोन महिन्यांत २०० वर प्रकल्प सुरू केले. 


यूपीए-२ मध्येही निवडणुकीआधी अशीच घाई उडाली होती. ५ मार्च २०१४ ला निवडणुकीच्या घोषणेच्या दिवशी यूपीए सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले होते. शीला दीक्षित यांना केरळच्या राज्यपाल नियुक्त केले होते. तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनी ५८ पानी निवेदन जारी केले होते. त्यात अँटनींना ‘मिस्टर क्लीन’ म्हटले होते.  यूपीए सरकारने डायल ए सिलिंडर योजना सुरू केली होती. त्यात छोटे सिलिंडर फोन केल्यानंतर दोन तासांत मिळेल, असे म्हटले होते. पीएमओतर्फे लागोपाठ सहा ट्विट केले गेले होते. त्यात तत्कालीन पीएम मनमोहन सिंग यांनी म्हटले होते,‘ कमी बोललो, काम बोलले.’


सर्वात खर्चिक निवडणूक : ५० हजार कोटींवर खर्च होण्याचा अंदाज व्यक्त 
कारनीज एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस थिंकटँक’ मधील वरिष्ठ अधिकारी व दक्षिण आशिया कार्यक्रमाचे संचालक मिलन वैष्णव म्हणाले, २०१६ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ४६,२११ कोटी रुपये (६५० कोटी डॉलर) खर्च झाले. वैष्णव यांच्या मते, भारतात जर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३५,५४७ कोटी (५०० कोटी डॉलर) खर्च झाले असतील तर  २०१९ च्या निवडणुकीत अमेरिकन निवडणूक खर्चाचा आकडा सहज पार होईल. यंदा ५० हजार कोटींपेक्षा अधिक खर्च होण्याची आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...