आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Addressed The Indians In Bahrain, Saying, "I Wish Janmashtami Best Wishes To Indians Spread Across The World."

नरेंद्र मोदींनी बहरिनमधल्या भारतीयांना संबोधित केले, यावेळी जगभरातील भारतीयांना दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनामा- पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज(शनिवार) बहरिनमधील भारतीय नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "भारताच्या पंतप्रधानाच्या स्वरूपात बहरीनमध्ये येण्याची संधी मिळाली, तुमचे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. भारतातली विविधता हीच त्याची शक्ती आहे. मी श्रीनाथजींच्या मंदिरात जाऊन तुमच्या देशाच्या समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करणार आहे. हे खूप जुने मंदिर आहे. गल्फ देशांतही कृष्ण कथा ऐकण्याची परंपरा आजही सुरू आहे. भारतीयांचे भगवान कृष्णाप्रती विशेष प्रेम आहे. बहरीनच्या प्रगतीत भारतीयांचे मोठे योगदान आहे. आपले हे नाते फक्त सरकारांचे नाही, तर संस्कारांचे आहे."

पुढे ते म्हणाले, "मला पाच हजार वर्षे जुन्या संबंधांना पुन्हा चालना द्यायची आहे. मी खास बहरीनमधल्या भारतीयांना भेटण्यासाठीच आलो आहे. येथील भारतीय समुदायाला न्यू इंडियासाठी आमंत्रित करत आहे. बहरीनबरोबर भारताचे कायमच व्यापारी संबंध राहिले आहेत. आज जन्माष्टमीचा पवित्र दिवस आहे. जगभरात पसरलेल्या भारतीयांना जन्माष्टमीच्या माझ्याकडून अनंत शुभेच्छा."

"तुम्ही तुमच्या भारतातल्या कुटुंबीयांना विचारल्यास तेसुद्धा तुम्हाला भारतातल्या वातावरणात आता बदल झाला असल्याचे सांगतील. तुम्हाला भारताला बदललेले पाहायचे आहे का नाही?, भारत आता प्रगतीची एक-एक शिखरं पार करत आहे. भारताचे चांद्रयान-2 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर उतरणार आहे. या प्रगतीमुळे जगभरात भारताच्या अवकाश मोहिमेचीच चर्चा आहे. भारताने एवढ्या कमी खर्चात चंद्रावर यान कसे काय पाठवले, यामुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे." 

या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदींनी बहरीनचे शाह हमद बिन इसा अल खलीफा यांच्यासोबत विविध द्विपक्षीय आणि स्थानिक मुद्यांवर चर्चा केली. विमानतळावर मोदी येताच बहरीनचे पंतप्रधान शहजादे खलीफा बिन सलमान अल खलीफा त्यांच्या स्वागतासाठी आले होते. चर्चेपूर्वी मोदींचे अल गुदैबिया पॅलेसमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.

मोदी फ्रांस, संयुक्त अरब अमीरात आणि बहरीनच्या आपल्या तीन देशांच्या दौऱ्यादरम्यान तिसऱ्या टप्प्यात बहरीनला गेले होते. बहरीनला जाण्यापूर्वी संयुक्त अरब अमीरातमध्ये त्यांना अबु धाबीचे शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत चर्चा केली आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना चांगले करण्याबाबत चर्चा केली. अबु धाबीचे शहजादे, मोदींनी विमानतळापर्यंत सोडण्यास आले. बहरीनवरुन मोदी रविवारी जी-7 बैठकीसाठी फ्रांसला जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...