आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नवी दिल्ली - सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या मंगळवारी संध्याकाळी 5 तास बैठक झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मे रोजी पंतप्रधान मोदींसह 65 मंत्री शपथ घेऊ शकतात. यांमध्ये 40 नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल. या बैठकीत अमित शहा व्यतिरिक्त अकाली दलाचे हरसिमरत कौर आणि लोजपाचे रामविलास पासवान यांच्यासह युवा नेत्यांच्या नावावर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपने 542 पैकी 303 जागांवर विजय प्राप्त करून बहुमताने पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार आहे. तर एनडीएला एकूण 352 जागा मिळाल्या आहेत.
मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी
सुत्रांच्या मते, नवीन मंत्रिमंडळात अनेक दिग्गज आणि सध्याच्या मंत्र्यांना पुन्हा संधी न देता नवीन चेहऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. पण लोजपाचे रामविलास पासवान आणि भाजपचे काही वरिष्ठ नेते मंत्रीपदावर कायम राहु शकतात. मित्रपक्षांमध्ये शिवसेना आणि जेडीयूला दोन मंत्रीपदे देण्याची शक्यता आहे. यामध्ये एक कॅबिनेट तर एक राज्य मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
राजनाथ, गडकरी आणि सीतारमण यांनी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता
यावेळी देशाला नवीन आर्थिक, रक्षा आणि परराष्ट्र मंत्री मिळू शकतात. मोदी सरकारमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांना तगडे मंत्रिपद मिळू शकते. वरिष्ठ नेत्यांमध्ये राजनाथ सिंह, नितिन गडकरी, निर्मला सीतारमण, रवि शंकर प्रसाद, पीयूष गोयल, नरेंद्र सिंह तोमर आणि प्रकाश जावडेकर यांना पुन्हा एकदा कॅबिनेटमध्ये जागा मिळू शकते. अरुण जेटलींची प्रकृतीच्या कारणामुळे ते मंत्रीपद घेण्यास इच्छुक नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.