• Home
  • National
  • narendra modi and cabinet oath taking ceremony live news and updates in marathi

Modi 2.0 / 'मै नरेंद्र दामोदरदास मोदी...' सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदी मोदी शपथबद्ध; मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात

सुषमा स्वराज, अरुण जेटलींचा मंत्रिमंडळात समावेश नाही

दिव्य मराठी

Jun 04,2019 10:21:06 AM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात झाली. यात सर्वप्रथम राजनाथ सिंह आणि त्यानंतर अमित शहा यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकार 2.0 म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या कॅबिनेटमध्ये केंद्रातील प्रमुख नेते राहिलेल्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा समावेश नाही. या दोन्ही नेत्यांनी मंत्रिपद नको असल्याचे यापूर्वीच पत्र लिहून कळवले आहे. जेटली उपचारासाठी परदेशात असून सुषमा स्वराज यांनी शपथविधी समारंभाला उपस्थिती लावली. परंतु, त्यांनी व्यासपीठावर बसणे टाळले. मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात राजकारण, उद्योग, बॉलिवूड आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींसह परदेशातील नेत्यांनीही उपस्थिती लावली आहे.

Live Updates

> कैलाश चौधरी आणि देबश्री चौधरी यांनी घेतली शपथ

> रामेश्वर तेली आणि प्रतापचंद्र सारंगी यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

> रेणुका सिंह सरूता यांनी घेतली गोपतीयतेची शपथ सोमप्रकाश मंत्रीमंडळात सामील

> रतनलाल कटारिया आणि व्ही. मुर्लीधरन यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

> सुरेश अंगडी आणि नित्यानंद राय मंत्रीमंडळात सामील

> संजीव कुमार बालियान, संजय धोत्रे आणि अनुराग सिंह ठाकुर यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

> निरंजण ज्योती आणि बाबुल सुप्रियो यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

> रामदास आठवलेंनी घेतली परत एकदा मंत्रीपदाची शपथ

> गंगापुरम किशन रेड्डी, पुरूषोत्तम रुपाला यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

> प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ

> कृष्णपाल गुर्जर यांनी घेतली शपथ

> अर्जुन राम मेघवाल आणि व्ही. के. सिंह मंत्रीमंडळात सामील

> मुनसुख मांडवीय, फग्गनसिंह कुलस्ते आणि अश्विनी कुमार चौबे यांनी घेतली शपथ

> किरण रिजीजू, प्रल्हाद सिंह पटेल, राजकुमार सिंह, हरिदीप सिंग पुरी मंत्रीमंडळात सामील

> राव इंद्रजीत सिंह, श्रीपाद नाईक आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

> संतोष कुमार गंगवाल यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ

> गिरीराज सिंह, गजेंद्र सिंह शेखावत

> डॉ. महेंद्रनाथ पांडे आणि डॉ. अरविंद सांवतांनी घेतली शपथ

> मुख्तार अब्बास नख्वी आणि प्रल्हाद जोशी शपथ घेऊन मंत्रीमंडळात सामील

> पीयूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

> डॉ. हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर शपथ घेऊन मोदींच्या मंत्रीमंडळात सामील

> स्मृती इराणी यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

> झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा आता मोदी सरकारमध्ये मंत्री

> थावरचंद गहलोत, सुब्रह्मण्यम जयशंकर, डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना मंत्रिपदाची शपथ

> हरसिमरत कौर बादल यांचा मोदी कॅबिनेटमध्ये समावेश, मंत्रिपदाची शपथ

> रवीशंकर प्रसाद यांनाही पुन्हा केंद्रीय मंत्रिपदाची संधी

> नरेंद्र सिंह तोमर यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ

> रामविलास पासवान यांचा मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये समावेश

> एनडीए-1 मध्ये संरक्षण मंत्री राहिलेल्या निर्मला सीतारमण यांनाही मंत्रिपद, इंग्रजीतून घेतली शपथ

> शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये जदयू नेत्यांचा समावेश नाही

> डीव्ही सदानंद गौडा यांनी इंग्रजीत घेतली मंत्रिपदाची शपथ

> नितीन गडकरी यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> भाजप अध्यक्ष अमित शहांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> राजनाथ सिंह यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

> राष्ट्रपतींच्या परवानगीनंतर शपथविधीला सुरुवात

> राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आगमन, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात

> उपराष्ट्रपती व्यंकैया नायडू राष्ट्रपती भवन परिसरात पोहोचले
> पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी नरेंद्र मोदींचे आगमन
> अनेक नवीन चेहरे, युवक आणि महिलांना संधीची शक्यता

X