आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Narendra Modi Appealed For Support To Caa By Launching India Support Campaign On Social Media

माेदींनी सोशल मीडियावर इंडिया सपोर्ट कॅम्पेन सुरू करत समर्थन करण्याचे केले आवाहन

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • हा नवा कायदा नागरिकत्व देण्यासाठी, हिरावण्यासाठी नाही : पंतप्रधान मोदी
 • नागरिकत्व कायद्याबाबत ४ समज व त्यावर सरकारचा युक्तिवाद

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समर्थन देण्यासाठी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली. मोदींनी ट्विटरवर ‘हॅशटॅग इंडिया सपोर्ट सीएए’ मोहिमेला सुरुवात केली. त्यांनी या कायद्याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा आहे व यामुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावले जाणार नाही. त्यांनी सीएएवर अाध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांचा एक व्हिडिओ शेअर केला. यात नागरिकत्व कायद्याबाबत सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींनी लिहिले की, सीएएच्या ऐतिहासिक संदर्भदेखील समजता येतील.नागरिकत्व कायद्याबाबत ४ समज व त्यावर सरकारचा युक्तिवाद

समज

 • सीएए घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणला आहे.
 • सीएएमुळे बांगलादेशातून हिंदूंचे भारतात येणे वाढेल.
 • सीएएमुळे बंगाली भाषक लोकांचा दबदबा वाढेल.
 • नागरिकत्व दुरुस्ती कायदा ईशान्येतील आदिवासी भागातही लागू होईल.

सरकारचा युक्तिवाद

 • गेल्या ७० वर्षांत ज्यांना मूलभूत अधिकार मिळाले नाहीत त्यांना नागरिकत्व देण्याची ही केवळ घटनात्मक प्रक्रिया आहे. घुसखाेर नव्हे, तर खऱ्या शरणार्थींना यात अधिकार असतील.
 • गेल्या काही वर्षांत बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. यामुळे तेथून पलायनाची शक्यता खूप कमी. सीएए तसेही ३१ डिसेंबर २०१४ कालमर्यादेनंतर भारतात आलेल्या अल्पसंख्याकांसाठी नाही
 • आसामच्या बराक व्हॅलीत बहुतांशी हिंदू बंगाली राहतात. येथे बंगाली आधीपासूनच दुसरी शासकीय भाषा आहे, तर ब्रह्मपुत्र व्हॅलीत वेगवेगळ्या भागात हिंदू बंगाली राहतात. त्यांनी आसामी भाषा स्वीकारली आहे.
 • नागरिकत्व दुरुस्ती कायद्यातील तरतुदी अासाम, मेघालय, मिझोरम व त्रिपुरातील आदिवासी भागात लागू होणार नाहीत.
बातम्या आणखी आहेत...