आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस्स,आता देश दहशतवाद सहन करणार नाही: मोदी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद  - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. गाझियाबादमध्ये रविवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआयएसएफ) ५० व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित समारंभात मोदी म्हणाले, ‘दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही गप्प बसू शकत नाही. बस, आता खूप झाले. भारत प्रदीर्घ काळापर्यंत दहशतवादापासून होणारे नुकसान सहन करणार नाही.’ पुलवामा आणि उरी येथील दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, माझ्या सरकारने दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाई केलेली आहे.  सीआयएसएफ म्हणजे देशाच्या आणि औद्योगिक प्रतिष्ठानांच्या सुरक्षेचा आधार आहे, अशी टिप्पणी करून मोदी म्हणाले की, ‘वैभवशाली भारताच्या निर्माणात या दलाचे योगदान अमूल्य आहे. तुमची कामगिरी खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण जेव्हा शेजारील देश शांत आहे, लढण्यास सक्षम नाही, पण देशावर अंतर्गत रूपात हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल. दहशतवादाचे वेगळे रूप समोर आले तर देशाचे संरक्षण करणे आणखीनच कठीण होते. लष्करी गणवेश धारण करणाऱ्या मुलींची संख्या सीआयएसएफमध्ये सर्वाधिक आहे. मी या मुलींचे आणि त्यांच्या मातांचेही अभिनंदन करतो.’ आपत्तीच्या स्थितीतही सीआयएसएफच्या योगदानाची प्रशंसा करताना मोदी म्हणाले की, केरळमध्ये आलेल्या भीषण पुरात सीआयएसएफने मदत आणि बचावकार्यात रात्र आणि दिवस एक करून हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी मदत केली.  


सीआयएसएफसाठी व्हीआयपी संस्कृती सर्वात मोठे आव्हान   
मोदी म्हणाले की, व्हीआयपी संस्कृती सीआयएसएफच्या ड्यूटीत सर्वात मोठा अडथळा आहे. आमची तपासणी कशी काय करता, असे म्हणत अनेकदा माझ्यासारखे लोक अडून बसतात. त्यामुळे माझे सरकार व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या बाजूने आहे. कुठल्याही एखाद्या व्यक्तीची सुरक्षा करण्यापेक्षा जास्त कठीण काम संस्थांची सुरक्षा करणे हे आहे. कारण तेथे ३० लाखांपर्यंत लोक राहतात.  

बातम्या आणखी आहेत...