आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोण ठरवतो मोदींचा दिनक्रम, भाजपच्या वरिष्ठांनाही याची माहिती नसते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धूरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांकडे असल्याची माहिती पुढे आली आहे. यात रॅली आयोजित करणे, सभेचे ठिकाण निर्धारित करणे यापासून मोदींच्या भाषणाचाही समावेश असतो. भाजपच्या काही नेत्यांसोबत समन्वय राखत संघाचे नेते मोदींच्या प्रचाराचे नियोजन करताना दिसून येत आहे.
मोदींच्या प्रचाराच्या कोअर ग्रुपमध्ये आहेत सोनी, रामलाल आणि गुजरातमधील तीन मंत्री
राजकीय रणनिती आखण्यात संघाचे नेते मोदींना मदत करीत आहेत. मोदींच्या प्रचाराचा दिनक्रम कोअर ग्रुप ठरवत असतो. कोअर ग्रुपमध्ये संघाचे सहकार्यवाह सुरेश जोशी, सुरेश सोनी, भाजपचे सरचिटणिस रामलाल, व्ही. सतिश आणि सौदानसिंह यांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव धर्मेंद्र प्रधानही या कोअर ग्रुपमध्ये आहेत.
यात गुजरात सरकारमधील तीन वरिष्ठ मंत्री आणि नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय नितिनभाई पटेल, सौरभ पटेल आणि आनंदीबाई पटेलही सामिल आहेत. पडद्याच्या मागे राहुन मोदींना पॉलिटिकल इनपुट्स देण्याचे कामही या ग्रुपकडून केले जाते. यात मोदींचे आणखी एक निकटवर्तीय अमित शहा हेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावित आहेत. या कोअर ग्रुपचे नियोजन अत्यंत गोपनिय पद्धतीने अंमलात आणले जाते. त्यामुळे याची माहिती भाजपचा वरिष्ठ नेत्यांनाही नसते.
कसे केले जाते नियोजन वाचा पुढील स्लाईडवर.....