Home | National | Delhi | narendra modi in noida

मुंबई हल्ल्यावेळी दिल्लीत थंड सरकार होते : पंतप्रधान मोदी

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Mar 10, 2019, 11:09 AM IST

आता पुलवामा हल्ला झाला. भारतीय वीरांनी केलेले काम अनेक दशकांत झाले नव्हते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

 • narendra modi in noida

  ग्रेटर नोएडा - भारतीय सैन्याने पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. खरे तर २०१६ मध्ये सरकारने पहिल्यांदाच दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना धडक कारवाईतून उत्तर दिले होते. उरीनंतर आम्ही सर्जिकल स्ट्राइक केली. तेव्हा लोक आम्हाला त्याचे पुरावे मागत होते. आता पुलवामा हल्ला झाला. भारतीय वीरांनी केलेले काम अनेक दशकांत झाले नव्हते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.


  मोदींनी भाषणातून संपुआ सरकारवरही टीका केली. शत्रूंच्या मनात भारताबद्दलची एक प्रतिमा बनली होती. त्यामागे तत्कालीन सरकारचे वागणे कारणीभूत होते. २६ /११ ची घटना कोणीही विसरू शकणार नाही. तेव्हाच दहशतवाद्यांवर कारवाई व्हायला हवी होती. परंतु सरकारने काहीही केले नव्हते. तेव्हा सैन्याचे रक्त खवळत होते. दिल्लीतील सरकार मात्र ढिम्म होते. थंड होते, अशी टीका त्यांनी केली. तत्पूर्वी, मोदी गुरुवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आले होते.


  नोएडात प्रकल्पांचे उद्घाटन
  दिल्लीच्या शेजारी असलेल्या ग्रेटर नोएडामध्ये त्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन शनिवारी मोदींच्या हस्ते पार पडले. त्यांचा हा गेल्या २६ दिवसांतील ७ वा यूपीचा दौरा होता.मोदी पुढे म्हणाले, मी छोटी स्वप्ने पाहत नाही आणि छोटे काम करणेही मला आवडत नाही. आज आम्ही ‘वन नेशन-वन ग्रीड’ चे स्वप्न पूर्ण केले आहे. ग्रेटर नोएडाची पूर्वी आेळख लूट, जमिनी लाटणे व घोटाळे अशी हाेती. आता नोएडाचा कायापालट झाला आहे, असा दावा मोदींनी केला.नोएडाची आेळख सरकारी संपत्ती लुटणारे अशी होती. ती बदलली आहे. २०१४ मध्ये या भागात मोबाईलचे केवळ २ कारखाने होते. आता ही संख्या १२५ वर गेली आहे.


  तरीही काही मोठ्या नेत्यांना प्रश्न पडले
  भारतीय हवाई दलाच्या कारवाईमुळे पाकिस्तान त्रस्त होता. तेव्हा देशातील ‘तुकडा-तुकडा गँग’ चे लोक वेगळीच चर्चा करत होते. बालाकोट कुठे आहे ? असा प्रश्न त्यांना पडला होता. मोदींनी केले असे पाकिस्तान म्हणत होता. तेव्हा देशातील काही मोठ्या नेत्यांना त्यावरही शंका घ्यावी वाटली. त्यांची ही भाषा शत्रूंसारखी आहे. त्यामुळे देशाच्या शत्रूंना अशा नेत्यांमुळे बळ मिळू लागले आहे, असा टोला मोदींनी लगावला.


  पाक पायदळ सज्ज; आपला हवाई दणका
  पुलवामानंतर पाकिस्तानला हल्ल्याची शंका होती. त्यामुळे पाकने सीमेवर सैन्य सज्ज केले होते. परंतु भारताने पाकला हवेतून दणका दिला. ही कारवाई करून आम्ही शांत होतो. परंतु मध्यरात्री साडेतीन वाजता पाकिस्तानची मात्र झोप उडाली होती.

Trending