आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi In West Bengal News In Marathi, Politics

पश्चिम बंगालमध्ये बेगडी \'परिवर्तन\', नरेंद्र मोदी यांचा ममता बॅनर्जींवर जोरदार प्रहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिलिगुरी- पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन दिसून येत नसून तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी व्होटबॅंक पॉलिटिक्स खेळत आहेत, असा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये 'परिवर्तन' करण्याचा नारा देऊन ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत सत्ता काबिज केली होती, हे विशेष.
प्रचार सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, की पश्चिम बंगालमध्ये सरकार बदलले तर विकास होईल असे मला वाटत होते. परंतु, तसे काहीही झालेले नाही. ममता बॅनर्जी केवळ व्होटबॅंक पॉलिटिक्स खेळत आहेत. माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना अन्नही पचत नाही, असे दिसून येते.
यापूर्वी नरेंद्र मोदी यांची कोलकता येथे सभा झाली होती. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता तर दिल्लीत भाजपचे सरकार निवडून आणा, असे आवाहन केले होते. परंतु, ममता बॅनर्जी जवळपास प्रत्येक प्रचार सभेत मोदींवर तोंडसुख घेत असल्याने आता मोदींनी त्यांच्यावर प्रहार केल्याचे दिसून येत आहे.
मोदी म्हणाले, की आता जवळपास दोन वर्षे झाली आहेत. तरीही पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन दिसून येत नाही. तृणमूल कॉंग्रेस पक्षाने जनतेला मुर्ख बनविले आहे. जर केंद्रात सक्षम आणि विकासाचा विचार करणारे सरकार असेल तर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. पश्चिम बंगालच्या जनतेचे बनावट परिवर्तन बघितले आहे. आता तुम्हाला खरे परिवर्तन दिसून येणार आहे.