आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Interview On India TV News In Marathi

FIXING: इंडिया टीव्हीवरील मोदींची मुलाखत होती फिक्स? एडिटोरियल डायरेक्टरचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची शनिवारी इंडिया टीव्हीवर दाखविण्यात आलेली मुलाखत वादात सापडली आहे. मोदींची मुलाखत फिक्स असल्याचे सांगितले जात आहे. या मुलाखतीनंतर इंडिया टीव्हीचे एडिटोरियल डायरेक्टर कमर वहीद नकवी यांनी राजीनामा दिला आहे.
डेलीभास्कर डॉट कॉम या वेबसाईटसोबत बोलताना नकवी यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या काही दिवसांमध्ये पत्रकार परिषद बोलवून भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे.
नरेंद्र मोदी यांची मुलाखत फिक्स असल्याने नकवी यांनी राजीनामा दिला आहे, असे आपचे नेते आणि नकवी यांचे ज्युनिअर आशुतोष यांनी ट्विट केले आहे.
नकवी यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास राजीनामा दिला होता. आपचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला. त्यांनी भाजपवर मीडियाला धमकाविण्याचा आरोप लावला आहे.
केजरीवाल यांच्या वक्तव्यावर भाजप आणि कॉंग्रेसकडून आलेल्या प्रतिक्रिया-
सुधांशू मित्तल, भाजपचे नेते-
केजरीवाल यांचे दिल्लीत सरकार होते तेव्हा त्यांनी मीडियाला तुरुंगात पाठविण्याची धमकी दिली होती. आता तेच आमच्यावर आरोप लावीत आहेत. केजरीवाल यांचे मानसिक संतुलन बिघडले आहेत.
मिनाक्षी लेखी, प्रवक्ते, भाजप-
अरविंद केजरीवाल खोटे बोलून राजकारण खेळत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मीडियाला धमकी दिली होती.
संजय झा, प्रवक्ते, कॉंग्रेस-
मला माहित नाही, केजरीवाल यांच्याकडे काय माहिती आहे. परंतु, भाजप हुकुमशाही असलेला पक्ष आहे आणि भारतातील लोकशाहीला आव्हान देत आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, नकवी यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुक आणि ट्विटरवर उठवेले वादळ....