आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Is The Only Indian To Reach The Top 20 With 5 Crore Twitter Followers, Barack Obama Is At Number 1 With 10.8 Crore

5 कोटी ट्विटर फॉलोअरसोबत टॉप-20 मध्ये पोहचणारे नरेंद्र मोदी एकटे भारतीय, 10.8 कोटींसोबत बराक ओबामा पहिल्या नंबरवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आज(सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर 5 कोटी फॉलोअर्स झाले. आता सर्वात जास्त फॉलोअर्सच्या यादीत मोदी 20 व्या नंबरवर आहेत. ते टॉप-20 मध्ये पोहोचणारे एकमेव भारतीय आहेत. जगातील मोठ्या नेत्यांमध्ये मोदी आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षा 1.4 कोटीने मागे आहेत.    तर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा 10.8 कोटी फॉलोअर्स सोबत पहिल्या स्थानावर आहेत.


पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) च्या अधिकृत ट्विटर अकाउंटचे फॉलोअर 3 कोटी झाले आहेत. मोदींनी जानेवारी 2009 मध्ये ट्विटर जॉइन केले होते. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींची ट्विटरवर प्रसिद्धी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर झाली.

भारतात मोदीनंतर केजरीवाल दुसऱ्या नंबरवर
भारतीय नेत्यांमध्ये मोदीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या नंबरवर आहेत. त्यांचे फॉलोअर 1 कोटी 54 लाखांपेक्षा जास्त आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह1 कोटी 52 लाख फॉलोअर्ससोबत तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्यानंतर 1 कोटी 41 लाख फॉलोअरसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चौथ्या नंबरवर आहेत, तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी 1 कोटी 6 लाख फॉलोअर्ससोबत पाचव्या स्थानावर आहेत.