आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी म्हणाले, जशोदाबेन माझी पत्नी; त्या म्हणाल्या, मोदीच पंतप्रधान होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात)- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा स्वीकारले आहे, की जशोदाबेन माझी पत्नी आहे. मोदींनी काल (बुधवार) बडोदा येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांनी पत्नीच्या रकान्यात जशोदाबेन यांचे नाव लिहिले आहे. यावर कॉंग्रेसने जोरदार प्रचार केला आहे तर नरेंद्र मोदी यांचे बंधू सोमभाई यांनी त्यांचा बचाव केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत जशोदाबेन म्हणाल्या होत्या, की नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील.
जशोदाबेन पत्नी असल्याचे जाहीर झाल्यावर कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह म्हणाले, की नरेंद्र मोदी यांनी स्वीकार केले आहे, की त्यांचे लग्न झाले आहे. परंतु, एखाद्या महिलेवर पाळत ठेवणाऱ्या आणि एका महिलेला तिच्या हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या व्यक्तीवर देश विश्वास टाकू शकतो का. मोदींच्या विरोधात मतदान करा.
दुसरीकडे मोदींचा बचाव करताना सोमभाई म्हणाले, की 45-50 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. आता पुन्हा त्यावर चर्चा करणे व्यर्थ आहे.
यापूर्वी विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पत्नीचा रकाना मोकळा ठेवत होते. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, जर पत्नीचा रकाना रिकामा राहिला तर उमेदवारी अर्ज रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना आपल्या पत्नीचा उल्लेख करावाच लागला.
जशोदाबेन म्हणाल्या, मोदीच पंतप्रधान होतील...वाचा पुढील स्लाईडवर