आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्व हिमालयापेक्षा उंच, समुद्रापेक्षा खोल : मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर/हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जाेधपूर व हैदराबादमध्ये सभा घेतल्या. जाेधपूरमध्ये त्यांनी राहुल गांधींच्या हिंदुत्वावरच्या प्रश्नाला उत्तर दिले. ते म्हणाले, मोदींना हिंदुत्वाचे ज्ञान आहे की नाही यावर राजस्थान मतदान करेल? हो करेल, हिंदुत्व हजारो वर्षे प्राचीन विपुल वारसा आहे. हे अगाध, विशाल व चिरंजीव अाहे. या संपूर्ण ज्ञानाची समजण्याची माणसात क्षमता नाही. हिंदुत्व हिमालयापेक्षाही उंच व समुद्रापेक्षाही खोल आहे. ते समजणे सोपे नाही. ऋषी-मुनींनीही कधी दावा केला नाही की त्यांना हिंदू व हिंदुत्वाचे ज्ञान आहे म्हणून. या ज्ञानाचे भांडार माझ्याकडे आहे, असा दावा मी करू शकत नाही. नामदार तो करू शकतात. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने सर्वाेच्च न्यायालयात दिलेल्या लेखी दस्तऐवजात म्हटले की, भगवान रामाचे कोणते प्रमाण नाही. हे काल्पनिक पात्र आहे आणि आता तेच मला विचारतात हिंदुत्वाचे ज्ञान आहे की नाही? राहुल गांधी यांनी शनिवारी उदयपूरमधील सभेत मोदी यांना हिंदुत्वाचा पाया माहीत नसल्याचे म्हटले होते.


तेलंगणात उमेदवार जिंकण्यासाठी केली जातेय घुबडांची तस्करी
बंगळुरू | कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये पोलिसांनी तेलंगण सीमेनजीक सेदाममध्ये ६ जणांना घुबडांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केली. तेलंगण निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी या पक्ष्यांची ऑर्डर दिल्याचे चौकशीत समोर आले. ते विरोधी उमेदवाराच्या गुडलकला बॅडलकमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयोग करतात. एक घुबड ३ ते ४ लाख रुपयांना विकले जाणार होते.


केसीआर बनले खावा कमिशन राव : राहुल गांधी
हैदराबाद | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी तेलंगणात २ सभा घेतल्या. तिथे त्यांनी केसीआर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. राहुल म्हणाले, केसीआर तुम्ही एवढा भ्रष्टाचार केला की आता तुमचे नाव खावा कमिशन राव झाले आहे. मोदींनी तेलंगण रिमोट कंट्रोलने चालवले. तुम्ही (केसीआर) भ्रष्टाचारामुळे त्यांच्यासमोर उभे राहू शकत नाहीत, हे खरे वास्तव आहे.

 

बातम्या आणखी आहेत...