आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसकडून दलितांच्या दैवतावरही अन्याय - नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूर खिरी - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 123 व्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. गांधीनगरमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुरू झालेली टीका उत्तर प्रदेशातील सभांमध्येही सुरूच राहिली. काँग्रेसने आंबेडकरांचा अपमान केल्याचे त्यांनी लखीमपूर खिरीमध्ये सांगितले.

‘दोन दिवसांपूर्वी नेताजी (मुलायमसिंह यादव)’ हेलिकॉप्टर घेऊन आले होते, वळूने त्यांना उतरू दिले नाही, असे मी ऐकले आहे. नेताजी, माणसे तर सोडा; पण येथे वळूही तुमच्यावर नाराज आहेत. नेताजी, त्यांचे चिरंजीव (मुख्यमंत्री अखिलेश यादव), तुमचे एवढे मोठे सरकार, तुम्ही एवढे शक्तिशाली नेते; पण एका वळूला आवर घालू शकत नसाल, तर माझ्या गुजरातचा बब्बर शेर कसा आवर घालणार ?
(लखीमपूर खिरीमध्ये वळू उधळल्यामुळे मुलायमसिंह यादव यांचे हेलिकॉप्टर उतरू शकले नव्हते. तेथे मुलायसिंहांची सभा होणार होती. वळू पकडता पकडता पोलिस अधिकार्‍यांना घाम फुटला होता.)

सोनियाजी, तुम्ही तर बिसलरी पीत आहात...
‘उत्तर प्रदेशातील 70 टक्के लोकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. सोनियाजी तुम्ही तर आई आहात. ही मुले अशुद्ध पाणी पीत आहेत आणि तुम्ही बिसलरीचे पाणी पीत आहात. 75 % लोकांकडे वीज नाही. 21 व्या शतकात माझा देश अंधारात जगतो आहे. शेतकर्‍यांचे हाल आहेत. दरदिवशी पूर येतो. अटलजींनी नदी जोडण्याचे स्वप्न पाहिले होते. जर नद्या जोडल्या तर कोरड्या नद्यांमध्ये पाणी येईल. ‘जय जवान, जय किसान’ असा नारा शास्त्रीजींनी दिला होता. पण यांनी (यूपीएने) कधीच शेतकर्‍यांचा जयजयकार केला नाही. ‘मर किसान, मर जवान’हाच यांचा नारा आहे.’

तिन्ही पक्षांनी यूपीत उच्छाद मांडला
‘सपा, बसप आणि काँग्रेसने मिळून उत्तर प्रदेशात उच्छाद मांडला आहे. दर आठवड्याला 13 दलितांचे खून होतात. 21 दलित महिलांवर बलात्कार होतात. 5 दलितांची घरे जाळली जातात. आजही 70% दलित महिला निरक्षर आहेत.’