आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Bhagpat Uttar Pradesh

जवानांचे शीर कापणाऱ्या पाकच्या पंतप्रधानांना चिकण बिर्याणी? नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भागपत (उत्तर प्रदेश)- एकिकडे भारतीय सीमेत घुसखोरी करुन पाकिस्तानचे जवान भारतीय लष्कराच्या जवानांचे शीर कापतात तर दुसरीकडे आपले सरकार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चिकण बिर्याणी खाऊ घालते, असा जोरदार हल्ला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांचे नाव न घेता केंद्र सरकारवर केला आहे. विशेष म्हणजे सलमान खुर्शिद यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांना नपुंसक म्हणून खळबळ उडवून दिली होती. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना शाही मेजवानी देण्याची जबाबदारी खुर्शिद यांच्यावर होती.
'मोदी' 'मोदी' असा जल्लोष करणाऱ्या सभेला संबोधित करताना मध्येच वीज गेल्याने नरेंद्र मोदी यांना भाषण थांबवावे लागले. त्यावर टोला मारताना मोदी म्हणाले, की गुजरातमध्ये वीज गेली तर त्याची बातमी होते. परंतु, उत्तर प्रदेशात वीज आली तर त्याची बातमी होते. एवढा दोन्ही राज्यांमध्ये फरक आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, की मिरत, गाझियाबाद, गौतमबुद्धनगर यांचा विकास दिल्लीचे सॅटेलाईट शहर असा करता येईल. उत्तर प्रदेशातील राजकारणातून घराणेशाही जात नाही तोपर्यंत राज्याची प्रगती होणार नाही. उत्तर प्रदेशातील राजकीय पक्षांकडे व्हिजन नाही. असे असताना विकास कसा साधता येईल. आमची आई आणि बहिण सुरक्षित समजत नसेल तर तशा वातावरणाला सुरक्षित कसे काय म्हणता येईल? आधी कॉंग्रेसचा नारा होता जय जवान, जय किसान. आता तो मर जवान, मर किसान असा झाला आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सांगतात, की नरेंद्र मोदी एक विचारसरणी आहे. मला याचा अभिमान आहे.