आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेसने मोबाईल दिला, पण तो चार्ज करायला वीज कोण देणार? नरेंद्र मोदी यांचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुर्णिया (बिहार)- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बिहारी जनतेशी आज (सोमवार) भोजपुरीतून संवाद साधला. यावेळी कॉंग्रेसवर हल्ला चढविताना मोदी म्हणाले, की कॉंग्रेसने प्रत्येक नागरिकाच्या हाती मोबाईल दिला असा दावा केला जात आहे. परंतु, मोबाईल चार्ज करण्यासाठी वीज कोण देणार? कॉंग्रेसच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांना आकाश टॅबलेट देण्याची घोषणा केली होती. परंतु, हा टॅबलेट विद्यार्थ्यांच्या हातात कधी पडणार?
बनारसच्या पाच पुजाऱ्यांनी शंखनाद केल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरवात झाली. भोजपुरी या स्थानिक भाषेत संवाद साधत मोदींनी जनतेची मने जिंकली. त्यांनी जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि संपूर्ण देशाला होळीच्या रंगांप्रमाणे भाजपचा रंग चढलेला आहे, असे सांगितले.
मोदी म्हणाले, की निवडणुकांची घोषणा झाल्यावर तिसरी आघाडी अस्तित्वात येते. देशावर संकटे येतात तेव्हा ही तिसरी आघाडी कुठे असते. ही आघाडी देशाचा काय विकास साधणार. सत्ता काबीज करणे हाच या आघाडीचा उद्देश आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अनेक पक्ष सहभागी होत आहेत. केवळ सरकार स्थापन करण्याचा आमचा उद्देश नाही तर प्रगतिशील सरकार हे आमचे धेय्य आहे. लालू प्रसाद यादव यांना तर बिहारमधील गाई-म्हशीही घाबरल्या आहेत. कॉंग्रेससोबत केलेल्या आघाडीने नुकसान तर होणार नाही ना, अशी चिंता यादव यांना लागली आहे. परंतु, लोकशाहीत आघाडी लठबंधन करून होत नाही. कॉंग्रेसमध्ये पंतप्रधानपदाचे अनेक उमेदवार आहेत.
बिहारमधील मुस्लिम समाजावर अन्याय झाला आहे. बिहारमधील 45 टक्के मुस्लिम गरीब आहेत. या तुलनेत गुजरातमध्ये केवळ एक टक्का मुस्लिम गरीब आहेत. गुजरातमध्ये आम्ही विकास करून दाखविला आहे. हाच मंत्र घेऊन पुढे चलण्याची आवश्यकता आहे. आमचा विविधतेत एकता यावर विश्वास आहे.
नरेंद्र मोदी यांच्या रॅलीची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर