आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेवानंतर आता मोदींची तुलना इंद्र देवाशी, बघा व्हायरल झालेला व्हिडिओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हर-हर मोदी या घोषणेवर झालेल्या वादानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. यात त्यांची तुलना चक्क इंद्र देवाशी करण्यात आली आहे. रामदेव बाबा यांच्या हस्ते हा व्हिडिओ लॉंच केला जाणार आहे. परंतु, यापूर्वीच हा व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाला आहे. चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांच्या मदतीने आणि भुतनाथ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक शर्मा यांच्यासोबत महावीर एस. जैन यांनी व्हिडिओ तयार केला आहे.
विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यावर यापूर्वी हर-हर महादेव ही घोषणा देण्यात आली होती. यावर तेव्हा बराच वाद झाला होता. द्वारका पिठाचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी यावर जाहीर नाराजी व्यक्त करीत भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याकडे तक्रार नोंदविली होती.
मोदींनी बघितलाय व्हिडिओ
व्हिडिओ गाण्यांवर आधारीत आहे. यात मोदींना इंद्र-नरेंद्र सांगण्यात आले आहे. तरुणाई, शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, हेही यात दाखविण्यात आले आहे. या व्हिडिओला नरेंद्र मोदी यांनी बघितले आहे.
तेव्हा घोषणा देण्याची मनाई केली होती
हर-हर मोदी घोषणेवर नाराजी व्यक्त करीत मोदी म्हणाले होते, की ही घोषणा कुणीही देऊ नये.
पुढील स्लाईडवर बघा व्हिडिओ....