आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: \"नरेंद्र मोदी की बोटी-बोटी काट देंगे\", कॉंग्रेस उमेदवाराची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहारणपूर (उत्तर प्रदेश)- "मोदी की बोटी-बोटी काट देंगे", असे कॉंग्रेसचे सहारणपूर येथील उमेदवार इमरान मसूद यांनी त्यांच्या समर्थकांच्या सभेत म्हटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 'मारने' 'काटने' या सारख्या शब्दांचा प्रयोग करीत मसूद यांनी अप्रत्यक्षपणे मोदींना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, मसूद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
समर्थकांसमोर भाषण ठोकताना इमरान मसूद म्हणाले, की गुजरातमध्ये केवळ चार टक्के तर उत्तर प्रदेशात 22 टक्के मुस्लिम आहेत. जर मोदींनी उत्तर प्रदेशला गुजरात करण्याचा प्रयत्न केला तर येथील मुस्लिम त्यांना चांगलाच धडा शिकवतील. त्यांची बोटी बोटी केली जाईल. येथील लहान मुलांनाही मोदींविरुद्ध लढण्याचे शिक्षण दिले जाईल. मी माझ्या लोकांसाठी कुणालाही ठार मारु शकतो किंवा स्वतः मरू शकतो.
आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले मसूद
चिथावणीखोर भाषणावर बोलताना मसूद म्हणाले, की माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. लोकशाहीच्या मार्गाने मोदींना प्रत्युत्तर द्या, असे आवाहन मी केले होते. दरम्यान, मसूद त्यांच्या वक्तव्यावर ठाम असून त्यावर माफी मागण्यास इन्कार केला आहे. गुजरात दंगलीची मोदी माफी मागतील तरच मी माफी मागेल, असेही मसूद म्हणाले.
यासंदर्भात राज बब्बर म्हणाले, की मसूद यांनी मोदीबाबत दिलेले वक्तव्य चुकीचे आणि स्वीकार करण्यासारखे नाही.
सीपीआयचे डी. राजा म्हणाले, की हे एक गंभीर प्रकरण आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला हवी.
पुढील स्लाईडवर बघा मसूद यांच्या भाषणाचा व्हिडिओ....