आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेस टरबुजासारखी, बाहेरुन हिरवी तर आतून लाल, मोदींचा घणाघाती हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांसाठी असुरक्षित असलेल्या भारतातील दहा राज्यांमध्ये केरळचा समावेश होतो, असे सांगून महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केरळ सरकारवर घणाघाती हल्ला केला. यावेळी मोदी म्हणाले, की कॉंग्रेस टरबूजासारखी आहे. बाहेरुन हिरवी तर आतून लाल.
नरेंद्र मोदी यांची आज केरळमधील कसारागोड येथे प्रचार सभा झाली. यावेळी मोदी म्हणाले, की महिलांसाठी असुरक्षित असलेल्या दहा राज्यांमध्ये सहा राज्यांची सत्ता कॉंग्रेसच्या हातात आहे. विशेष म्हणजे या दहाही राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. काही दहशकांपूर्वी केरळमध्ये पर्यटन एक मोठा व्यवसाय होता. केरळला पर्यटनाचे हब होता आले असते. परंतु, दुर्दैवाने आता केरळची भूमी दहशतवादी कारवायांसाठी वापरली जात आहे.
विदेशी जहाजांवरील इटलीच्या नौदलाच्या जवानांनी दोन भारतीय मच्छिमारांना ठार मारल्यावर टीका करताना मोदी म्हणाले, की तुम्हीच सांगा सध्या हे जवान कोणत्या तुरुंगात आहेत? ओमन चंडी सरकार मच्छिमारांना न्याय देऊ शकले नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार इटलीच्या दोषी जवानांवर कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे.
मोदी म्हणाले, की सध्या केरळ सरकार मनी ऑर्डन इकॉनॉमीवर चालत आहे. विदेशात असलेली मुले त्यांच्या आई-वडिलांना पैसे पाठवितात. त्यावर राज्याचा अर्थसंकल्प अवलंबून आहे. परंतु, ही मुले खरंच सुरक्षित आहेत? येथील मुलांना नोकरीसाठी आपले राज्य सोडून विदेशात जावे लागत आहे. ही परिस्थिती बदलायला हवी.