आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narendra Modi Offers Prayers At Himalayan Shrine Of Kedarnath, Reviews Redevelopment Projects In Kedarnath Dham

केदारनाथमध्ये पुजेनंतर 2 किलोमीटर चढाई करून गुफेत पोहचले मोदी, उद्या सकाळपर्यंत तिथेच ध्यान करणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तराखंडच्या दोन दिवसाच्या यात्रेवर केदारनाथला पोहचले आहेत. तिथे त्यांनी अर्धा तास पुजा-अर्चना केली. त्यानंतर 2 किलोमीटर चढाई करून मोदी एका गुफेत पोहचले. त्या गुफेत मोदी उद्या सकाळपर्यंत ध्यान करण्यासाठी बसणार आहेत. काही फोटोज घेतल्यानंतर आता येथे मीडियाला बंदी घालण्यात आली आहे. केदारनाथवरून मोदी रविवारी बद्रीनाथाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.


पंतप्रधान कार्यालयाने उत्तराखंड दौऱ्याची माहिती निवडणूक आयोगालादेखील दिली आहे. आयोगाकडून सांगण्यात आले की, मोदींच्या या यात्रेमुळे आयोगाला काहीच त्रास होणार नाहीये. आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पतंप्रधानांची ही एक अधिकृत यात्रा आहे, त्यामुळे ती केली जाऊ शकते. त्यासोबतच आयोगाने पीएमओला सांगितले आहे की, आचारसंहिता अजून लागू आहे.
 

पोलिस कर्मचारी मोबाईल वापरू शकणार नाहीत- डीजीपी
उत्तराखंडचे पोलिस महानिदेशक(डीजीपी) अशोक कुमार यांनी मोदींच्या एत दिवसीय यात्रेदरम्यान मोबाईल न वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच न सांगता ड्यूटीस्थळ न सोडण्यासदेखील सांगितले आहे. ड्यूटी दरम्यान हलगर्जीपण करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई केली जाईल. 


9 मे रोजी उघडले केजारनाथचे कपाट
यावर्षीय 9 मे रोजी केदारनाथचे कपाट उघडण्यात आले आहेत. तसेच याठिकाणी एकसोबत 6 हजार लोक थांबू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान 300 पेक्षा जास्ती टेंट लावण्यात आले आहेत. बद्रीनाथचे कपाट 10 मे रोजी उघडण्यात आले आहेत. 


पुढील स्लाईडवर पाहा मोदींच्या यात्रेचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...