आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Pays Tribute To BR Ambedkar News In Marathi

कॉंग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, नरेंद्र मोदी यांचा सडकून प्रहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. यावेळी बोलताना मोदी यांनी कॉंग्रेसवर सडकून प्रहार केला. मोदी म्हणाले, की बाबासाहेबांनी केलेल्या कामाचे क्रेडिट कॉंग्रेस घेत असून त्यांना घोर अपमान केला जात आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, की आज दलित, गरीब आणि शोषित वर्गाची दिवाळी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. आज बाबासाहेबांचा जन्मदिवस आहे. त्यांनी गरीब आणि शोषित जनतेला मुक्ती मिळवून दिली. भारतीय घटना अमुल्य आहे. ही घटना साकारण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
मोदी पुढे म्हणाले, की घटनेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला अनेक अधिकार दिले. परंतु, दुर्दैवाची बाबा ही आहे, की जवळपास रोजच कॉंग्रेस त्यांचा अपमान करीत आहे. कॉंग्रेसने जनतेला अधिकार दिले असा प्रचार केला जात आहे. कॉंग्रेसची नेते मंडळी अशा स्वरुपाचा दावा करत आहे. परंतु, आंबेडकरांनी हे अधिकार भारतीय जनतेला दिले आहेत. कॉंग्रेसने जेवढा बाबासाहेबांचा अपमान केला आहे तेवढा कुणीही केला नसावा.