आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देश प्रेमी v/s पत्नी प्रेमी: मोदी समर्थकांनी झळकाविले नेहरू-एडविना यांचे पोस्टर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पत्नीची माहिती जाहीर केल्यावर कॉंग्रेसने त्यांच्या खासगी आयुष्यावर हल्ले सुरू केले आहेत. या पार्श्वभूमिवर भाजपच्या समर्थकांनी 'पत्नी प्रेमी' अशा मथळ्याचे पोस्टर झळकाविले आहे. यात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत लॉर्ड माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना दिसत आहेत तर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना एक उत्साही कार्यकर्ती गालावर किस करताना दिसत आहे.
भाजपचे साहित्य प्रकाशक अशोक चौरसिया यांनी नेहरू-एडविना यांचे पोस्टर झळकाविले आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले आहे, की नरेंद्र मोदी यांनी जशोदाबेन माझी पत्नी असल्याचा खुलासा केल्यानंतर त्यावर कॉंग्रेसने हल्ला चढविला आहे. कॉंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी तर चक्क निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली आहे. परंतु, कॉंग्रेसच्या नेत्यांचे चरित्र बघितले तर आश्चर्याचा धक्का बसतो.
पोस्टरमध्ये कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव, समाजवादी पक्षाचे नेते महंमद आझम खान दिसतात. याशिवाय कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर यांचेही फोटो लावण्यात आले आहेत.