आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्राईलमधील निवडणूक प्रचारामध्ये नेतन्याहूंकडून मोदी आणि ट्रम्पच्या फोटोंचा वापर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इस्राईलमध्ये सप्टेंबर महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहूसह इतर राजकीय पक्षांनी प्रचार सुरु केला आहे. नेतन्याहूंच्या प्रचारात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो दिसून येत आहेत. इस्रायली पत्रकार अमिचाई स्तीन यांनी रविवारी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला होता. तर नेतन्याहूंनी इतर पोस्टरमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत दिसत आहेत.

 

इस्राईलमध्ये 17 सप्टेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान नेतन्याहू सरकारने इस्राईल आणि इतर देशाचे संबंध दृढ झाले असल्याचे जनतेला सांगण्यासाठी या पोस्टर्सचा वापर करण्यात येत असल्याचे सांगतिले जात आहे. नेतन्याहूंच्या नावे सर्वाधिक काळ इस्राईलचे पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम आहे. यावेळच्या निवडणुकीदरम्यान त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  ।

 

 

 

नेतन्याहूंनी मोदींना दिल्या होत्या शुभेच्छा 
भारतातील 2019 च्या लोकसभा निवडणुकीती विजयाबद्दल पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देणारे नेतन्याहू पहिले नेता होता. भारतासोबत पुढेही काम करण्याचे त्यांनी वचन दिले होते. भारत आणि इस्राईल दरम्यान अलीकडील काही वर्षांत आर्थिक, सैन्य आणि राजकिय संबंध दृढ झाले आहेत. 

 

 

 

 

 

बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरले होते नेतन्याहू
इस्राईलमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात निवडणुका पार पडल्या होत्या. पण एकाही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी युती करून सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. पण त्यात त्यांना अपयश आले. यानंतर इस्राईलच्या खासदारांनी संसद भंग करण्याचा बाजूने मतदान केले. संसद भंग करण्याचा प्रस्तावाच्या बाजुने 74 तर याच्या विरोधात 45 मते पडले होते. यासोबतच 17 सप्टेंबर निवडणुकीची तारीख निश्चीत करण्यात आली.