आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालातूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तीन सभा घेतल्या. त्यात दोन कर्नाटकात, तर एक महाराष्ट्रातील लातूरमध्ये होती. लातूरमध्ये त्यांनी काँग्रेसला पाकिस्तानप्रेमी ठरवत बालाकोटमधील हवाई हल्ला आणि पुलवामातील शहीद जवानांच्या नावावर मते मागितली. मोदी म्हणाले, काँग्रेस जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणार नसल्याचे म्हणत आहे. हीच बाब काँग्रेसच्या “ढकोसला पत्रात’(जाहीरनामा) आहे. पाकिस्तानही हीच भाषा बोलत आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात देशाचे तुकडे करणाऱ्यांना खुला परवाना देऊ, राष्ट्रद्रोहाचा कायदा संपुष्टात आणू, अशी आश्वासने दिली आहेत. पाकलाही हेच हवे आहे. नवमतदारांना मी आवाहन करू इच्छितो की, तुमचे पहिले मतदान पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला करणाऱ्या वीर जवानांसाठी समर्पित होऊ शकते का?
मोदी म्हणाले, ‘तुम्ही पाहिले, काँग्रेस नेत्यांच्या घरांतून नोटा निघाल्या. हे लोक ६ महिन्यांपासून चौकीदार चोर आहे म्हणताहेत. मात्र, या नोटा कुठून निघाल्या?’ तुम्हीच सांगा खरा चोर कोण आहे.
नाइलाजाची आघाडी...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर अखंड हल्ले चढवत होते. सोमवारी अमित शहा यांनी ही एकत्र येण्याची वेळ असल्याचे सांगितले.मोदी-ठाकरे एका मंचावर आले.
खांद्यावर हात ...
लातूरमध्ये मोदी-उद्धव ठाकरे मंचावर एकमेकांचा हात पकडत आले. मोदींनी ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवत संवाद साधला. मंचावरही दोघांमध्ये चर्चा सुरू होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.