आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोड शोनंतर नरेंद्र मोदींचा बडोद्यातून अर्ज दाखल, चहावाला झाला अनुमोदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात)- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) विराट रोड शोनंतर बडोद्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी एका चहा विक्रेत्यासह पाच जणांनी मोदींच्या अर्जाला अनुमोदन केले. मोदी गुजरातमधील बडोदा आणि वाराणसी येथून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
किरण माहिडा या चहा विक्रेता नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी अर्जाला अनुमोदक म्हणून उपस्थित होता. आजचा दिवस कायम माझ्या स्मरणात राहिल. हा दिवस माझ्यासाठी खास आहे. मी मोदींच्या आभारी आहे, असे माहिडा याने म्हटले आहे.
बडोद्यातील किर्तीस्तंभ येथून आज सकाळी नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला सुरवात झाली. त्यानंतर सुमारे दोन किलोमीटरचे अंतर पार करीत मोदींची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात आली. यावेळी मोदी एका उघड्या जीपमध्ये होते. भाजपचे हजारो कार्यकर्ते आणि गुजरातमधील वरिष्ठ नेते याला उपस्थित होते. मोदींनी बडोद्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज दिला. यावेळी माहिडासह पाच जणांनी त्याला अनुमोदन दिले.
पुढील स्लाईडवर वाचा नरेंद्र मोदी यांचे पॉलिटिकल करिअर...