आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची अंतराळ क्षेत्रातील प्रगती प्रशंसनीय; 2022 पर्यंत भारतीय अंतराळात जाऊ शकेल : मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात बुधवारी 72वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. मोदींनी आज पाचव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून शेती, आरोग्य, अंतराळ, संरक्षण, महिला सशक्तीकरण, रोजगार, अशा अनेक विषयांवर विचार मांडले.


2019 निवडणुकीपूर्वी हे मोदींचे शेवटे भाषण होते. या भाषणासाठी त्यांनी देशवासियांकडून सुचना मागवल्या होत्या. त्यांच्याकडे जवळपास 30 हजारहून अधिक सुचना दाखल झाल्या. लोकांनी त्यांना रोजगार निर्माण आणि आरोग्य सुविधांच्या मुद्द्यांवर विचार मांडण्याची सुचना केली होती. 

 

मोदी LIVE: 

> आदिवासी तरूणांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकवून देशाची शान वाढवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लाल किल्यावरून चंद्रपूरच्या तरूणांचे कौतुक...

> भारत जगभरातील सर्वात मोठी सहावी अर्थव्यवस्था...

> स्वतंत्र्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सैनिकांना अभिवादन...

> ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्यात आला आहे.
> लष्कर देशाच्या सेवेसाठी दिवस-रात्र कर्तव्य पार पाडत आहे.

> जीएसटी लागू केला, व्यापाऱ्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला
> स्वप्न छोटी असली की, निर्णय होत नाही, विकास होत नाही. स्वप्न मोठी असावी लागतात.
> काही करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक काम पूर्ण होते.
> शेतकऱ्यांच्या उत्पादना किमान आधारपूत किंमत दिली आहे...
> शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पटीने वाढवले- मोदी
>गावागावात शेतकऱ्यांकडून रेकॉर्डब्रेक ट्रॅक्टरची खरेदी सुरू आहे.
> देशातील प्रत्येकामध्ये आज आत्मविश्वास निर्माण झाला आहे. 
> संविधान आमच्यासाठी मार्गदर्शक आहे - मोदी
>  2013 नंतर देशाच्या प्रगतीने वेग पकडला...

- 13 कोटी मुद्रा कर्ज, त्यापैकी 4 कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले, हा बदललेल्या देशाचा पुरावा आहे.

> शत्रूशी दोन हात करण्यासाठी लष्कर नेहमी सज्ज
> येत्या 30 वर्षात भारत विश्वप्रगतीचा स्त्रोत असेल.
> जगभरातील तज्ञांकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक सुरू आहे...

> भारताची अंतराळ क्षेत्रात प्रशंसनीय प्रगती - मोदी
> 100 उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण करून देशाने जगाचे लक्ष वेधले
> 2022 पर्यंत प्रत्येक भारतीय अंतराळात जाऊ शकेल - मोदी   
> गेल्या चार वर्षांत देशातील जनतेला बदलाची जाणीव झाली...
> देशातील बंद पडलेल्या सिंचन प्रकल्पांचे काम सुरू....
> कठोर निर्णय घेण्याची हिम्मत आम्ही दाखवली - मोदी

> पंतप्रधान मोदींकडून जनआरोग्य योजनेची घोषणा...

> सामान्य भारतीयांसाठी मोठी घोषणा...

> 25 सप्टेंबरपासून जन आरोग्य अभिनयाला सुरुवात करणार....

> भविष्यात भारतीयांसाठी मोफत आरोग्य सुविधेची व्यवस्था करू - मोदी

> 2013 पर्यंत टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 4 कोच होती आता ती 7.75 कोटी झाली आहे.
> तुमच्या टॅक्समुळे तीन गरिब लोकांचे पोट भरते - मोदी
> कुणाचे पोट भरल्याचे पुण्य मोठे असते - मोदी


पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी चार वेळा आपल्या भाषणातून मोठ मोठ्या योजनांची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया- स्टँड अप इंडिया, वन रँक-वन पेंशन, गावा-गावात वीज आणि गरिबांना मोफत सिलेंडर या सारख्या योजणांचा उल्लेख केला आहे.

बातम्या आणखी आहेत...