इंटरव्यू : पंतप्रधान मोदी यांनी घेतली अक्षय कुमारची फिरकी, म्हणाले - 'तुमची पत्नी ट्विंकल ट्विटरवर माझ्याविरुद्ध राग व्यक्त करते' 

ट्विंकलने दिली प्रतिक्रिया... 
 

दिव्य मराठी

Apr 24,2019 03:44:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : एकीकडे जिथे अक्षय कुमार देशात होणाऱ्या प्रगतीचे श्रेय नरेंद्र मोदी यांना देऊन त्याचे कौतुक करत आहे. तर दुसरीकडे त्याची पत्नी ट्विंकल खन्ना मात्र याच्या उलट आहे. ती अनेकदा मोदी आणि त्यांच्या सरकारविरुद्ध सोशल मीडियावर आपले विचार लिहून चर्चेत असते. अशातच जेव्हा अक्षय कुमारने नरेंद्र मोदी यांचा राजकारणापासून थोडा वेगळा एक इंटरव्यू घेतला तर मोदी ट्विंकलच्या ट्वीटबद्दल अक्षयसोबत बोलायला विसरले नाही.

मोदी म्हणाले, 'ट्विंकल माझ्यावर काढते राग...'
इंटरव्यूदरम्यान जेव्हा अक्षयने मोदींना विचारले कि तुम्ही सोशल मीडियावर किती वेळ घालवता. तेव्हा ते म्हणाले की, 'मी तुमचेही ट्विटर बघतो आणि ट्विंकल खन्नाचेदेखील बघतो. कधी कडझि तर मला वाटते की, ती माझ्यावर राग काढते ट्विटरवर, त्यामुळे तुमच्या कौटुंबिक आयुष्यात खूप शांतता असेल. तिचा पूर्ण राग माझ्यावर निघत असेल तर तुम्हाला आराम मिळत असेल. तर अशा प्रकारे मी तुमच्या कामी आलो आहे.

ट्विंकलने दिली प्रतिक्रिया...
मोदी यांनी इंटरव्यूमध्ये केलेल्या वक्तव्यावर ट्विंकलने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले, 'मी हे सर्व सकारात्मक दृष्टीने बघेल की, अखेर पंतप्रधानांना माझ्या अस्तित्वाबद्दल माहित आहे आणि ते माझे काम वाचतात देखील.'

X