Modi Government / नरेंद्र मोदी 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रीय भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेणार

मोदींसोबतच राष्ट्रीय भवनात इतर केंद्रीय मंत्रीदेखील शपथ घेतील

दिव्य मराठी वेब टीम

May 26,2019 06:52:19 PM IST

नवी दिल्ली- नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी 7 वाजता मोदींसोबतच इतर केंद्रीय मंत्रीदेखील शपथ घेतील. मोदींची शनिवारी एनडीएकडून नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. मोदींनी राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला.


मोदींची नवीन घोषणा- "सबका साथ-सबका विकास और सबका विश्वास"
सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर मोदींनी शनिवारी राष्ट्रपती भवनात म्हटले होते की, लोकांसाठी काम करण्यासाठी आता एक मिनीटही वाळा घालवणार नाही. ते म्हणाले- "देशाने मला मोठा जनादेश दिला आहे. हा जनादेश मला त्यांच्या विश्वासामुळे मिळाला आहे." याआधी त्यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या बैठकीत भाषण दिले. येथे मोदींनी नवीन खासदारांना नवीन घोषणा दिली, "सबका साथ-सबका विकास और सबका विश्वास'।

X
COMMENT