आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसी : प्रत्येक बूथ, गल्लीबोळ, मोदी यांचेच, आप तर शहरात नावालाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - सार्वत्रिक निवडणूक 2014 ची सर्वात मोठी लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल यांच्यात आहे. एक पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि दुसरे त्यांना हरवून दाखविण्याचे आव्हान देणारे. परंतु ही लढाई सुरू होण्यापूर्वीच संपल्याचे चित्र दिसत आहे. मोदी यांच्या भाजपची एकजूट प्रत्येक गावागावात, प्रत्येक गल्लीबोळात, प्रत्येक बूथवर दिसत आहे. त्याच वेळी केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीकडे स्थानिक कार्यकर्ते नगण्य दिसून येत आहेत. शहर पातळीवरच त्यांचे कार्यकर्ते दिसतात. या लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा क्षेत्र हे वाराणसी शहरांतर्गत आहेत. म्हणजे शहरी व दोन रोहनिया व सेवापुरी हे ग्रामीण भाग, जेथे आपला सध्यातरी फारसा पाठिंबा मिळालेला दिसून येत नाही.

रोहनियाच्या आमदार त्याच अनुप्रिया पटेल आहेत, ज्यांच्या अपना दल या पक्षास भाजपने समझोता म्हणून दोन जागा देऊ केल्या आहेत. रोहनियात अनुप्रियाच्या जातिबांधवांची संख्या अधिक आहे. आता आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आशा या केजरीवाल यांच्यावरच आहेत. उद्या सकाळी ट्रेनद्वारे येथे पोहोचून अरविंद 12 मेपर्यंत मतदान होईपर्यंत येथेच मुक्काम ठोकणार आहेत. फक्त एक-दोन वेळा ते अमेठीत जाणार आहेत. येथे ते प्रसिद्ध संकटमोचन मंदिराचे महंत प्रोफेसर विश्वंभरनाथ मिर्श यांच्या घरी थांबतील. मनीष सिसोदिया आणि संजय सिंहसारख्या अन्य आप नेत्यांनी तर आधीच येथे तळ ठोकलेला आहे. गमतीची बाब अशी की, डिसेंबरमध्ये याच महंतांनी गंगा प्रदूषणाचा मुद्दा ठसविण्यासाठी मोदींची स्तुती केली.

आप नेत्यांनी कौमी एकता दलाने माघार घेतल्याने आशा बाळगल्या होत्या. गतवेळी मुख्तार अन्सारी भाजपाच्या डॉ. मुरली मनोहर जोशींकडून 17 हजार मतांनी हरले होते. असे वाटले की, अन्सारी यांना मिळालेली मुस्लिम मते ही केजरीवाल यांना मिळतील. ते तुल्यबळ लढतीसाठी सज्ज तर होतील. परंतु असे काही घडण्याची शक्यता आता अजिबात दिसत नाही. समाजवादी पार्र्टीचे कैलाश चौरसिया, काँग्रेसचे अजय राय आणि बसपाचे विजय प्रकाश जायस्वालसुद्धा मुस्लिम मतांचा दावा सांगतात. स्वत: आप नेता मनीष सिसोदिया भास्करला म्हणाले, ना मुख्तार अन्सारी यांनी आम्हाला सर्मथन देण्याची घोषणा केली आहे, ना आमची त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली आहे. आम्हाला अन्सारींचा पाठिंबा ही केवळ मीडियाचे पिल्लू आहे. चौरसिया जवळच्याच मिर्झापूरमधून आमदार बनलेले असून, राय लागोपाठ पाचवेळा आमदार बनले आहेत. तीन वेळा भाजपकडून, एक वेळ अपक्ष तर 2012 मध्ये कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. राय म्हणतात, माझी मुसलमान नेत्यांशी सलगपणे चर्चा होत आहे. थोड प्रमाण सोडलं तर मुसलमान कॉंग्रेसलाच मते देतील. असेही माझ्याशिवाय बाकी सर्वच उमेदवार बाहेरचे आहेत.

राय 2009 चे लोकसभा निवडणूक लढवित होते. सव्वा लाख मते मिळवून ते तिसर्‍या क्रमांकावर आहेत. असे म्हणतात की, मागील वेळेस मुख्तार अन्सारी आणि जोशी यांनी बनारसला जातीय आधारावर विभागले होते. त्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदा हरलो होतो. चार एसयुव्हीच्या शस्त्रधारी ताफ्यात चालणारे राय बाहुबली आहेत. 1991 साली त्यांचे मोठे बंधू अवधकिशोर राय यांची बनारसच्या लहुरावीर येथील घरासमोरच गोळ्यांनी चाळण केली होती. आतापर्यंत त्यांच्याविरूद्ध खटला चालू होता. अन्सारी माफिया डॉन आहेत. सध्या ते बदायू जेलमध्ये आहेत. राय यांचे नातलग आणि भाजपचे आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येचा आरोप आहे. बनारस हिंदू युनिर्व्हसिटीमध्ये राज्यशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. कौशल किशोर मिर्श म्हणतात की, कोणी विचारच कसे करू शकतील की, अन्सारी यांचे कट्टर दुश्मन राय यांना मुसलमान मते देतील.